"शिवसमर्थ" कडून पुस्तकांचे वाटप


"शिवसमर्थ" कडून पुस्तकांचे वाटप


कराड - ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांचे जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत तळमावले (ता.पाटण) येथील दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांनी पुस्तके वाटप करत दिन साजरा केला. 


अॅड.जनार्दन बोत्रे म्हणाले, ‘‘समृध्द आणि विविधांगी साहित्य परंपरा असलेल्या मराठी भाषेचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे. कुसुमाग्रजांच्या अथक परिश्रमामुळे मराठी भाषेस ज्ञानभाषा असा लौकिक प्राप्त झाला आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही पुस्तकांचे वाटप करत आहोत.


अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर यांनी लिहलेले ‘मोगÚयांचा गजरा’ या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या संकल्पनेतून सुमारे 200 पुस्तके वाटण्यात आली. या उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळाला.