जिल्हा परिषदेकडून कोरोना नियंत्रण सेल स्थापन..जिल्हास्तरावर मुख्य तर प्रत्येक पंचायत समिती स्तरावर एक कक्ष

जिल्हा परिषदेकडून कोरोना नियंत्रण सेल स्थापन..जिल्हास्तरावर मुख्य तर प्रत्येक पंचायत समिती स्तरावर एक कक्ष


बुलडाणा : भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मोठ्या वेगाने पसरत असलेल्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन आणि प्रशासन युद्धस्तरावर काम करीत आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेनेही आपल्या आरोग्य यंत्रणेसह विविध विभागांकडून यापूर्वी कोरोना जनजागृती अभियान राबविले आहे. गावात मुंबई-पुण्याहून आलेल्यांची माहिती गोळा करून ती यादी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्याचे काम ग्रामसेवकांनी केले आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेने आजपासून प्रत्येक तालुकास्तरावर कोरोना नियंत्रण सेलची स्थापना केली असून जिल्हा मुख्यालयी जिल्हा नियंत्रण सेल असणार आहे. बाहेर पडणारे ‘होम क्वारंटाईन’, गावात गर्दी करणारे लोक किंवा कोरोनाबाबत अफवा पसरविणार्‍यांविषयीची माहिती या सेलमध्ये गोळा करण्यात येणार असून ग्रामिण भागातील लोकांनी कोरोना नियंत्रण सेलला उपरोक्त संदर्भात माहिती द्यावी, असे आवाहन जि.प. सीईओ शण्मुगराजन एस. तथा उपमुकाअ राजेश लोखंडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. 


कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. त्यावर कुठलीही लस नसल्यामुळे प्रतिबंध हाच उपाय आहे आणि कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे माणसांनी एकमेकांपासून दूर राहणे, शिंकतांना, खोकलतांना तोंडावर रुमाल धरणे, वेळोवेळी हात धुणे, मास्क लावणे असे उपायच कोरोनापासून बचावात्मक ठरतात. परंतु ग्रामिण भागातील नागरिक अद्यापही कोरोनाला घेवून गंभीर नसल्याचे आढळले आहे. गर्दी करणे, एकाच गाडीवर तिन-तिन, चार-चार जण बसणे, विनाकारण घराबाहेर पडणे, असे प्रकार सर्रास सुरु असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुकास्तरावर कोरोना नियंत्रण सेल स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकात म्हटले आहे. तालुकास्तरीय नियंत्रण सेलचा प्रमुख संबंधीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) असतील तर जिल्हा कोरोना नियंत्रण सेलची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन उपमुकाअ राजेश लोखंडे यांच्याकडे असणार आहे. पुढे तालुकास्तरीय नियंत्रण सेलच्या प्रमुखांचा मोबाईल संपर्क क्रमांक दिला असून जे लोक गर्दी करतात, विनाकारण बाहेर पडतात तसेच फिरणार्‍या होम क्वारंटाईनची माहिती संबंधीत नियंत्रण सेलला कळवावी. यासंदर्भात तत्काळ पुढील कार्यवाही केली जाईल, असे सीईओ शण्मुगराजन यांनी पत्रकात म्हटले आहे.


संपर्क क्रमांक याप्रमाणे ः कोरोना बुलडाणा जिल्हा नियंत्रण सेल प्रमुख राजेश लोखंडे उपमुकाअ ९८५०२१३३०६ आणि श्री फुटाणे ८८३०७७३१७९, अनिरूद्ध देशपांडे ९९६०६९०६९८ तसेच बुलडाणा बीडीओ एस.पी. सावळे ९४२०३३८०७५, मोताळा बीडीआ श्री मोहोड ९४२२८६९२८९, मलकापूर बीडीओ श्री मानकर ८८८८७८२८१२, नांदुरा बीडीओ श्री चव्हाण ९०११३२८१२५, खामगांव बीडीओ श्री राजपूत ९४२०१४७३७३, शेगांव बीडीओ गौतम भगत ९९२११४६७७७, जळगांव जामोद बीडीओ श्री भारसाकळे ९८२२२८६७३७, संग्रामपूर बीडीओ श्री चव्हाण ९४२३२३८०४७, चिखली बीडीओ श्री कांबळे ९७६६७६९५५४, मेहकर बीडीओ आशिष पवार ९९२२८९९८१०, लोणार बीडीओ श्रीमती तांबे ९७३०७२११६६, देऊळगांवराजा बीडीओ श्री इंगळे ७७४४७९५३५ आणि सिंदखेडराजा बीडीओ श्री शिंदे ९४२३१९२१९९