कोरोना विरुद्धच्या युद्धात कराड अर्बन बँक ग्राहकांच्या मदतीला : दिलीप गुरव


कोरोना विरुद्धच्या युद्धात कराड अर्बन बँक ग्राहकांच्या मदतीला : दिलीप गुरव


कराड - कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कराड अर्बन बँकेच्या सर्व शाखा उपलब्ध किमान मनुष्यबळावर तत्परतेने ग्राहक सेवा देत आहेत. कोरोना संसर्गाची व्याप्ती आणि 14 एप्रिल पर्यंतचा असणारा Lockdown विचारात घेऊन ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सुविधा व सोयी सवलती उपलब्ध करून देत आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलिप गुरव यांनी दिली.


जेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती किंवा आजारी व्यक्ती यांना रोख रकमेबाबत सुविधा घरपोच दिल्या जातील. ही सुविधा हवी असल्यास अशा ग्राहकांनी खाते असणार्‍या शाखेमध्ये संपर्क साधावा. ज्या कॅश क्रेडीट खात्यांच्या मुदती मार्च-एप्रिल महिन्यात संपलेल्या असतील किंवा संपणार असतील. त्यांना 31 मे 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कॅश क्रेडीट कर्ज सुविधा घेणाऱ्या व्यवसायिकांना त्यांच्या कामगारांचे पगार व अन्य प्रशासकीय खर्चासाठी कॅश क्रेडीट कर्ज मर्यादेच्या 10 टक्‍क्‍यांपर्यंत नियमित व्याजदराने विशेष उचल (TOD) तीन महिने मुदतीने देण्यात येईल.


रिझर्व बँकेच्या पतधोरण मधील मार्गदर्शक तत्वाप्रमाणे कर्जदारांना कर्ज हप्ता परतफेडीसाठी तीन महिन्यांचा दिलेला विश्रांती कालावधी (moratorium Period) चा फायदा ग्राहकांना देण्यासाठी बँकेच्या संगणक प्रणाली मध्ये योग्य ते बदल करून कर्जदारांना मार्च, एप्रिल व मे 2020 चे कर्ज हप्ते भरण्यासाठी पुढे मुदतवाढ मिळणार आहे. ज्या मुदत ठेवीदारांच्या मुदत ठेवींची मुदत या कालावधीत संपत आहे, अशा ग्राहकांनी फोन, एसएमएस किंवा ई-मेल द्वारे सूचना दिल्यास सदर मुदत ठेवीचे नूतनीकरण करण्यात येईल. बँकेची सर्व एटीएम व्यवस्थित सुरू आहेत ग्राहकांनी एटीएम सेवेचा वापर करावा.


डिजिटल सेवा जसे NEFT, RTGS, POS सुरू आहेत, त्याचादेखील जास्तीत जास्त वापर करावा.असे आवाहन कराड अर्बन को- आॅप बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलिप गुरव यांनी केले आहे.