बालवयातच साहित्य निर्मिती होते - शिक्षण संचालक दिनकर पाटील

बालवयातच साहित्य निर्मिती होते - शिक्षण संचालक दिनकर पाटील


कराड - बालवयातच मुलांच्या अंगी असलेल्या सुप्तकला गुणांना वाव दिलातर तो बाल साहित्यिक तयार होईल, आज मुलांच्या मनात काय चालले आहे याचे ज्ञान शिक्षकांनी,पालकांनी आत्मसात करून त्याप्रमाणे शिक्षण दिले पाहिजे असे प्रतिपादन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी केले.


कराड पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षण महोत्सवात विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक राजेंद्र माने होते प्रमुख उपस्थितीत होते. प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, साहित्यिक डॉ. बसवेश्वर चेंणगे,दत्तात्रय पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी उषा सांळुखे, सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, सदस्य रमेश चव्हाण, बाळासाहेब निकम,गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, पाटणचे गटशिक्षणाधिकारी नितीन जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी जमिला मुलाणी,चंद्रकांत निकम,महाबळेश्वर गटशिक्षणाधिकारी आंनद पळसे याची होती.


दिनकर पाटील म्हणाले, कराड तालुक्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या रुपाने एक साहित्यिक, राजकारणी समाज सुधाकर लाभले आहेत. जी माणसे मोठी होतात ती वाचनामुळे.वाचन संस्कृतीच जतन करण्यासाठी गेली वीस वर्षांपासून ग्रंथ महोत्सव साजरा केला जात आहे.यामुळे शिक्षकांना दिशा मिळाली आहे. कराड ही साहित्याची भुमी आहे.साहित्याचा उगम हा आपले आज्जी आजोबापासून होतो.


यावेळी वेळी डॉ. राजेंद्र माने, डॉ बसवेश्वर चेंणगे,डॉ. रामचंद्र कोरडे, दत्तात्रय पवार यांनी बाल साहित्य यावर चर्चा केली. सुमारे ५०ते ६०बालसाहित्यिकांनी आपले स्वरचित कथा,कविता, गीत याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर व जमिला मुलानी यांनी आभार मानले.