कराडमधील सामाजिक कार्यकर्ते आदिल मोमीन कराड गौरव पुरस्काराने सन्मानित


कराडमधील सामाजिक कार्यकर्ते आदिल मोमीन कराड गौरव पुरस्काराने सन्मानित


कराड - येणके या ग्रामीण भागातून आगाशिवनगर या उपनगरात छोटेखानी व्यवसाय सुरू करून व्यवसायबरोबरच समाजिक कार्य करत आपल्या मधुर वाणीने आणि सर्वांच्या अडीअडचणीत धावून जाण्याच्या सवयीने अल्पावधीत मोठा मित्र परिवार गोळा करून पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड मोठा मित्र संग्रह निर्माण करणाऱ्या ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष असलेल्या आदिल मोमीन यांना सन्मानित करून पुरस्कार देण्यात आला.


आमदार आनंदराव पाटील यांना राजकीय गुरू मानून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून हजारो जणांच्या अडचणी सोडवत बऱ्याच कुटुंबाचा चरितार्थाचे मार्ग बनलेले आदिल मोमीन त्या कुटुंबात देवदूतासारखेच आहेत . 
मागील निवडणुकीत आमदार आनंदराव पाटील यांचा शब्द प्रमाण मानून कार्यरत राहून कृष्णाच्या माध्यमातून आदिलभाई सध्या कार्यरत आहेत. डॉ सुरेश भोसले, अतुलबाबा भोसले,विनुबाबा भोसले यांच्या मार्फत गरजू रुग्णांच्या अडचणी सोडविण्यात आदिल मोमीन मग्न असून शेकडो कुटुंबावरील औषधोपचाराचा ताण आदिल मोमीन यांनी कमी केल्याने आदिल मोमीन आता रुग्णदूत झाले आहेत.


पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील विविध रुग्णांच्या समस्या सोडविण्यात आदिल मोमीन खूप मग्न असतात ह्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन आदिल मोमीन ह्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा ठरविले व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा देऊन आदिल मोमीन यांना सन्मानित करण्यात आले.


हा पुरस्कार माझा घरचा पुरस्कार असून माझ्या कामाचा वेग आणि आवाका वाढविण्यासाठी ह्या पुरस्काराने स्फुरण आले आहे असे मत व्यक्त करत आदिल मोमीन यांनी संयोजकाचे आभार मानले. आदिल मोमीन यांना पुरस्कार मिळाल्यामुळे आमदार आनंदराव पाटील (नाना), ठाणे आयुक्त (पोलीस कमिशनर)विवेक फणसळकर, ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी, महाराष्ट्र अध्यक्ष सादिकभाई शेख यांनी आदिल मोमीन यांचे अभिनंदन केले