महिला सक्षमीकरण 

महिला सक्षमीकरण 


महिला सक्षमीकरण धोरण राबवले जात आहे. कारण समाजामध्ये महिलांना पुरुषांच्याबरोबरीची वागणूक नाही. याचा विचार करून केंद्र व राज्य शासनाने महिलांना सर्व ठिकाणी 50 टक्के आरक्षण दिले आहे. महिलांना दिलेल्या आरक्षणामुळे सध्या महिला समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करताना दिसते आहेत. विशेष म्हणजे सार्वजनिक एसटी महामंडळाच्या खात्यामध्ये महिला सध्या कंडक्टर म्हणून काम करीत आहे त्याच बरोबर आता नव्याने एसटी चालक म्हणून ही महिलांची नियुक्ती केली गेली आहे. महिलांनी आत्तापर्यंत सायकल, दुचाकी वाहन, चार चाकी वाहन, इतकेच काय विमान, रेल्वे सुद्धां महिला चालवितात. देशाच्या संरक्षण खात्यामध्ये सुद्धा महिला अग्रक्रमावर आहेत.महिलांसाठी पूर्व परतून दिलेली सीमारेखा केव्हाच महिलांनी ओलांडले आहे ती सकारात्मक दृष्ट्या ओलांडताना महिला आपल्या कार्यकर्तृत्वाचा मध्ये कोठेही कमी दिसून येत नाहीत त्यामुळे महिलांच्या कर्तृत्वाला संधी देणे क्रमप्राप्त आहे. याचा विचार केंद्र व राज्य शासनाने तर केलाच आहे त्याचबरोबर समाजातील विविध घटकांनी सुद्धां करणे अत्यावश्यक आहे कारण पुरुषप्रधान देशांमध्ये स्त्रियांना यापूर्वी दुय्यमस्थान होते. हिंदुस्तानी संस्कृतीनुसार महिलेला विविध भूमिका बजावेल लागतात आई, बहीण, बायको, मावशी,आजी, आत्या, या ना त्यांची भूमिका बजावत असताना त्या कोठेही कमी मी पडत नाहीत दिसून येत नाहीत मग मात्र समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करताना त्यांना दुय्यम स्थान का द्यायचा याचा विचार करूनच स्त्रियांना सर्व क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी दिली गेली आहे आणि या संधीचे खरेच अनेक महिलांनी सोने करून दाखवलेला इतिहास सर्वांसमोर आहे. एखाद्या कुटुंबातील एक महिला सुशिक्षित असेल तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. याला कारण असे आहे की, महिला ह्या संपूर्ण कुटुंबाची देखभाल करीत असताना संस्काराची शिदोरी आपल्याकडून दुसऱ्या पिढीकडे देताना कोठेही कंजुषी करीत नाहीत. देशातील सर्वोच्च पंतप्रधान, राष्ट्रपती या पदावर महिलांनी आपल्या वेगळ्या कामाचा ठसा उमटविला आहे.महिलांना समानतेची वागणूक देणे, हेच मुळात मानवतावादी विचार म्हणावे लागतील. कारण महिलांना दुय्यम स्थानाची वागणूक देणे, ही अप्रगतिशील समाजाची लक्षण म्हणता येतील. मात्र सध्या तरी हिंदुस्थानातील स्त्रियांना सर्व क्षेत्रांमध्ये खुली मुभा देऊन त्यांच्या कार्य कर्तुत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. जागतिक महिला दिन साजरा होत असताना महिलांच्या विविध कार्य संपन्न, उत्तुंग भरारीला मानाचा मुजरा.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image