येडोबाे देवाची वार्षिक चैत्र यात्रा रद्द
कोयनानगर - कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येराड ता पाटण येथील येडोबाे देवाची वार्षिक चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचे संसर्गाचे संकट रोखण्यासाठी या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करुन मानकरी सासनकाठी धारक व भाविकांसह सर्वांनीच सहकार्य करावे असे आवाहन बनपेठ व येराडच्या ग्रामस्थानी केले आहे.
येडोबा यात्रेसाठी कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील दोन अडीच लाख भाविक येत असतात. त्यामुळे कोरोना संसर्ग होवू नये यासाठी तहसिलदार पाटण यानी कोरोनाचे विषाणु ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने त्यावर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार यात्रा रद्द करणेबाबत लेखी आदेश दिला आहे.
बनपेठ (येराड) येथील येडोबा देवाची वार्षिक यात्रेचा 8 मार्च ते 11 एप्रिल या कालावधी असून यात्रेसंदर्भात देवस्थान व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ पुजारी प्रमुख मंडळीनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
यात्रा काळातील सर्व धार्मिक विधी उत्सव छबिना आदी पुर्णपणे रद्द केले असुन याबाबत संबंधित स्थानिक पुजारी मंडळींना दिल्या. याशिवाय यात्रेसाठी सासनकाठी पालखी आणणे छोटे मोठी दुकाने प्रतिबंधीत केल्याचे या बैठकीत स्पष्ट केले. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रशासन व देवस्थान व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत यांनी यात्रेच्या दृष्टीने घेत असलेल्या निर्णयास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
येडोबा यात्रा रद्द झालेनं लाखो रूपयाची उलाढाल थांबणार आहे हाॅटेल मेवा मिठाई खेळणी थंडपेय पाळण आदी छोटे मोठे व्यावसायिक व दुकानदार याचे नुकसान होणार आहे. जानेवारी ते मे महिन्यातील ठराविक यात्रेत आपला व्यवसायावर वर्षभराचा उदरनिर्वाह चालवत असतात यावर्षी कर्ज काढुन माल खरेदी केली असुन कोरोनोमुळे यात्रा रद्द होत असलेनं आर्थिक अडचणीत सापडले आहेत