आप्पासाहेब गोरे यांचे निधन
कराड - सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आप्पासाहेब अंतोबा गोरे, पाल, (ता. कराड) यांचे गुरूवार वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. कारखान्याचे माजी संचालक भास्कर गोरे यांचे ते पिताश्री होत.
आप्पासाहेब गोरे यांनी१९६९ ते १९७७ या कालावधीमध्ये
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिले होते. कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य, कोयना सहकारी दुध संघाचे संचालक म्हणूनही काम पाहिलेले होते. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाल गावची सलग २५ वर्षे राजकीय सत्ता अबाधित ठेवून, ग्रामपंचायत सदस्य व सरपंच म्हणूनही
काम केले होते. गावच्या सर्वांगिण विकास कार्यात मोलाचे योगदान दिले व सामाजिक कार्यात त्यांचा विशेष सहभाग होता.
विविध स्तरावर कामकाज करतेवेळी समाजामधील सामान्यांच्या विकासासाठी आप्पासाहेब गोरे यांनी विशेष प्रयत्न केले. आप्पासाहेब गोरे यांचा स्वभाव शांत, संयमी व प्रेमळ होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, पुतने, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आप्पासाहेब गोरे यांच्या निधनाबद्दल सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी दुःख व्यक्त केले.