आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कोडोली- पाचवडेश्वर पूल मंजूर


आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कोडोली- पाचवडेश्वर पूल मंजूर


कराड : महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांकडून आज विधीमंडळात सादर केला गेला. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली गेली आहे. यामध्येच कराड तालुक्यातील पाचवडेश्वर – कोडोली यांना जोडणारा कृष्णा नदीवरील जवळपास ४५ कोटी रुपयांचा पूल मंजूर झाला आहे. बऱ्याच वर्षापासून या भागातील जनतेची पाचवडेश्वर – कोडोली पुलासाठी मागणी होत होती. अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या पुलासाठी माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केल्यामुळे हा पूल मंजूर झाला आहे.


या पुलामुळे कोडोली, कार्वे, वडगाव हवेली, शेरे, दुशेरे तसेच सोनसळ भागात राहणारे, तासगाव कडे जाणारे तसेच पुला पलीकडील पाचवड, वाठार अशी जवळपास ३० ते ३५ गावे या पुलामुळे जोडली जातील. पाचवडेश्वर – कोडोली या पुलामुळे आसपासच्या गावांचे दळणवळण सुखकर होणार आहे त्यांचा वेळ वाचणार असल्यामुळे दैनदिन प्रवास करणाऱ्यांना या पुलामुळे दिलासा मिळणार आहे.