आज दुपारी बारानंतर संपूर्ण कराड बंद


आज दुपारी बारानंतर संपूर्ण कराड बंद


कराड - "कोरोना" च्या पार्श्वभूमीवर आज बारानंतर संपूर्ण कराड बंद ठेवण्यात आले आहे. पूर्ण बाजार बाजारपेठेसह सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वत्र शुकशुकाट असून नागरिक घराच्या बाहेर पडलेले नाहीत.दरम्यान आठवड्यातील सोमवार व गुरुवार हे दोन दिवस सुरू राहतील. फक्त जीवनाश्यक वस्तूचे व्यवसाय सुरू राहतील असा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केला आहे.


नगरपालिका, महसूल, पोलीस खात्याचे अधिकारी-कर्मचारी संपूर्ण कराड शहरामध्ये फिरून व्यवसायिकांना बंद करण्याबाबत सूचना दिल्यानंतर व्यावसायिकांनी आपले व्यवसाय पूर्णपणे बंद केले आहेत. दरम्यान जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तूंचे व्यवसाय मात्र सुरू आहेत. यामध्ये मेडिकल, हॉस्पिटल, भाजीपाला, किराणामाल, दूध व्यवसाय सुरू आहेत. स्थानिक प्रशासन अधिकारी यांनी शासन निर्णयानुसार घेतलेल्या आदेशांची प्रत व्यवसायिकांना देण्यात यावी. अशा कर्मचाऱ्यांना सूचना केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रत्येक व्यवसायाला आदेशाची प्रत दिली आहे.नगरपालिका व पोलिसांच्यावतीने शहरांमध्ये धुळे पक्का वरून सूचना देण्यात येत आहेत.


ज़िल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करून बाहेरगावा वरून आलेल्या नागरिकांची माहिती संबंधित भाग लिपिक यांनी घ्यावी, सदरची माहिती, नगरपालिका मेल किंवा वेबसाईट याची लिंक देऊन गोळा करावी किंवा, सदर ची माहिती QR कोडने स्कॅन करून पाठवावी किंवा, सदर व्यक्तीचे स्वयंघोषणापत्र भरून घ्यावे याकामी नगरपालिका शिक्षक यांची मदत घ्यावी. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी कराड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देऊन काम करण्यास सांगितले आहे.


कराडमधील चार प्रवेशद्वारावर बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी हात धुण्यासाठी स्टॉल उभे करण्यात आले आहेत. पंधरा पथकाद्वारे औषध फवारणी विविध ठिकाणी केली जात आहे. सिग्र प्रतिसाद पथकाकडून घरोघरी जाऊन सर्वे करून उपाय योजनेचे पत्रके वाटप केली जात आहेत. खबरदारीच्या उपाय योजना केल्या असून प्रशासन दक्ष आहे.