नेटक-यारो वाचा "ज्ञानदा"चा कसा आहे प्रवास... वर्गातली ‘ढ’ विद्यार्थीनी ते न्यूज अँकर ज्ञानदा कदम...!


नेटक-यारो वाचा "ज्ञानदा"चा कसा आहे प्रवास...
वर्गातली ‘ढ’ विद्यार्थीनी ते न्यूज अँकर ज्ञानदा कदम...!


सकाळची सुरूवात ‘ब्रेकींग बातम्यानी’ करून महाराष्ट्र भरातल्या बातम्या आपल्या पर्यंत पोहचविणारी न्यूज अँकर ज्ञानदा कदम, हिचा जन्म मुंबईतल्या एका सर्व सामान्य सुसंस्कृत कुटुंबात झाला. आई आणि आजोबा शिक्षक असल्यामुळे अतिशय शिस्तप्रिय वातावरणात ती लहानाची मोठी झाली. तिचे शालेय शिक्षण मुंबईतील ‘कांदीबाल विद्यामंदीर’ मध्ये झाला. अभ्यासात आवड नसल्याने तिला लहानपणापासूनच काहीतरी वेगळं आणि इतरांपेक्षा वेगळे करायचे होते. म्हणून स्वप्नांचा मागोवा घेत इथवर पोहचली असं म्हणायला हरकत नाही. घरात आई शिक्षिका असून देखील त्यानी ज्ञानदाला कोणत्याच गोष्टीची सक्ती केली नव्हती. वर्गात ती दहा मुलात देखील नंबरात कधी नसायची. एके दिवस तिच्या शिक्षकांनी ‘मोठेपणी कोण’ व्हायच आहे’ असं प्रश्न विचारलं असता, तिने टिव्ही मध्ये दिसायचं आहे असं ठाम उत्तर दिलं होतं. पण तिचे हे उत्तर ऐकून वर्गातल्या मुलांनी तिची खिल्ली उडवली होती.


शालेय आणि विद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्या नंतर तिने पुढे “voice culture” चा कोर्स केला. आणि तिने पत्रकारीतेत पहिला पाऊल आकाशवाणी मध्ये ठेवला. आकाशवाणी केंद्रात रिपोर्टर म्हणून आठ महिने काम केल्या नंतर ती दैनिक लोकमत तसेच दैनिक लोकसत्ता सोबतही काम केले. त्यानंतर प्रिंट मिडियाला राम राम करून 2007 साली सुरू झालेल्या स्टार माझा अर्थात सध्याचा ए.बी पी माझा या न्यूज चॅनल सोबत काम सुरू केला.


रिपोर्टर म्हणून बरेच दिवस काम केल्या नंतर तिची कामगिरी पाहता चॅनल कडून न्यूज अँकरींग करण्याची जबाबदारी मिळाली. सुरूवातीला तिने रिपोर्टींग सोबतच अँकरींग म्हणून एक सात दोन काम केली. पण दोन्ही काम एक सात मॅनेज न झाल्याने तिने फक्त अँकर म्हणून कायमच काम करणं ठरवलं. 2008 सालापासून अँकर म्हणून सुरू झालेल्या ज्ञानदा चव्हाण कदमच्या या प्रवासाला तब्बल 13 वर्षे पूर्ण झाली आहेत.


ए.बी.पी माझाच्या माध्यमातून तिने अनेक अन्याया विरोधात वाचाही फोडला आहे. रणसंग्राम राघीणीचा, हुंडा विरोध,आरक्षण, दुष्काळ परिषद, महापूर अशा अनेक कार्यक्रमातून तिने महाराष्ट्राचा खरा चेहरा जगा समोर आणला. त्यासोबत ‘ माझा कट्टा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील अनेक मान्यवर व्यक्तींची तिने मुलाखतीही घेतल्या आहेत. म्हणून गेल्या अनेक वर्षाची ज्ञानदा कदमची कामगिरी पाहता तिला बेस्ट मिडीया आणि टेल्हीव्हीजन अँकर म्हणून दोन मानाचे पुरस्कारही मिळाली आहेत.


लहानपणी ‘ढ’ विद्यार्थीणी म्हणून सुरू झालेला प्रवास त्यानंतर टिव्हीवर झळकण्याचे स्वप्न पाहून त्याचा मागोवा घेवून आज महाराष्ट्राल्या आघाडीच्या न्यूज अँकर होण्यापर्यंतचा प्रवास खरच बेमीसाल आहे.


आज ज्ञानदा कदम अँकर सोबत एक गृहीणी म्हणूनही तितकीच खंबीर आहे. संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अँकर असली तरी एका सामान्य माणसांप्रमाणे ट्रेनने प्रवास करून ऑफीसला जाते. उन्हाळा असो किंवा पावसाळा कसल्याही बिकट परिस्थितीशी सामना करत ती ठळक बातम्या आपल्या पर्यंत पोहोचविते. तिची प्रसिद्धी पाहता ‘हवा येवू द्या’ सारख्या कार्यक्रमात देखील तिचे नक्कल केली जाते. नेटकरी देखील मेमेजच्या माध्यमातून तिला घरोघरी पोहचवितायत. सध्या ‘काय बोलतेस ज्ञानदा’ ही ट्रेंड महाराष्ट्रभर पसरली आहे.


दररोज ताज्या बातम्यांसह प्रसन्न चेहरा घेवून ठळक घडामोडी देणाय्रा ज्ञानदा कदमला स्टार मराठी कडून मानाचा मुजरा.