कराडमधील आठवडे बाजार रद्द

कराडमधील आठवडे बाजार रद्द


कराड - सध्या कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून, त्याच्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी (सातारा) यांचे 19 मार्च 2020 च्या आदेशान्वये कराड शहरात होणारा रविवार व गुरुवारचा आठवडा बाजार पुढील आदेश होईपर्यंत रद्द करण्यात आलेला आहे. असे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.