सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी "वर्क फ्रॉम होम" चा पर्याय निवडला


सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी "वर्क फ्रॉम होम" चा पर्याय निवडला


कराड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूला महाराष्ट्रातील जनतेने शंभर टक्के प्रतिसाद दिला. ही आनंदाची बाब आहे. दरम्यान महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला होता. सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिवसभर प्रलंबित असणारे अर्जांवर हात फिरवून हातावेगळी कामे केली आहेत. वास्तविक पाहता जनतेची कामे सातत्याने करीत राहावीत. या लोकभावनेचा आदर करून नेहमीच मंत्री बाळासाहेब पाटील हे काम करीत असतात. जनता कर्फ्यू असल्यामुळे आज घराबाहेर कोणीही पडले नाही. त्याचबरोबर मंत्री, आमदार, खासदार यांना भेटण्यासाठी अथवा कोणत्याही कामानिमित्त भेटायचे नसल्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्याकडे असणारे प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे छायाचित्र पाहिल्यानंतर असे लक्षात येते की, आजच्या दिवसांमध्ये त्यांनी अनेक कामे हातावेगळी केलेली दिसत आहेत.


नागरिकांनी स्वतःच्या तब्येतची काळजी घ्यावी, कुटुंबाची देखील काळजी घ्यावी. "कोरोना" सारखे आलेल्या संकटावर आपण नक्कीच मात करू, यासाठी प्रत्येक नागरिकाने जागृत राहून शासन करीत असलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.सहकारमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असताना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बाळासाहेब पाटील यांना सातत्याने वरिष्ठ पातळीवर शासकीय अधिकारी परिस्थितीची माहिती देत आहेत. त्याचबरोबर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सातारा जिल्हा स्तरवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांना पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सूचनांची अंमलबजावणी करावी अशा सूचना करीत आहेत.


सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिवसभर आपल्या निवासस्थानी थांबून वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला होता. राज्यभरातून आलेल्या निवेदन आणि अर्जावर निर्णय घेऊन प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत