पशुसंवर्धनविषयक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डची सुविधा
सातारा - केंद्र शासनाने किसान क्रेडीट कार्डची सुविधा पशुसंवर्धनविषयक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला असून पीएम किसान योजनेच्या लाभार्थीना पशुसंवधन विषयक व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होण्यासाठी किसान क्रेडीट कार्डची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
भारतीय रिझव्ह बँकेने, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडीट कार्ड योजना लागु रण्याबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना बँकांना पारित केल्या असुन या योजने अंतर्गत बँकामार्फत कर्ज मागणीचा एक पानी अर्ज (घोषणापत्रासह) विहीत करण्यात आला आहे. या योजन अंतर्गत शेतकऱ्यांना रुपये १.६० लाखापर्यंत कर्ज विनातारण (खेळते भांडवल स्वरुपात) किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून बँकामार्फत उपलब्ध होणार आहे.
तरी जिल्हयातील पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या नव्या विस्तारीत किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज व अनुषंगिक कागदपत्रांसह परिपुर्ण अर्ज आपले कार्यक्षेत्रातील बँकेकडे सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबधित लुक्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, डॉ. अंकुश परिहार न जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ संजय शिंदे यानी केले आहे.