नोव्हेल करोना विषाणूंचा कुक्कुट पक्षी व उत्पादने यांचेशी संबंध नाही - पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार

नोव्हेल करोना विषाणूंचा कुक्कुट पक्षी व उत्पादने यांचेशी संबंध नाही - पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार


 सातारा - महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन व्यवसायामध्ये देशात अग्रेसर आहे.  सन २०१९ च्या २० व्या  पशुगणनेनुसार राज्यामधे एकूण कुक्कट संख्या ७ कोटी ४२ लाख इतकी आहे. चीन या देशामध्ये आलेल्या “नोव्हेल करोना विषाणु" प्रादुभावाच्या अनुषगांने गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमावर (सोशल मेडीया, फेसबुक व व्हॉटस्अपद्वारे ) आपल्या देशात व राज्यात कुक्कुट मांस व इतर कुक्कुट उत्पादन यांच्या आहरातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय अफवा पसरविल्या जात आहेत.


 राज्यातील कुक्कुट पालन व्यवसायाशी लाखो शेतकरी यांचे चरितार्थ व हित निगडीत आहे. विशेषत: कुक्कुट पालन उद्योगाशी संलग्न मका व सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. तसेच कुक्कूट व्यवसाय राज्याच्या विकासाशी जोडलेला आहे.  कुक्कुट पक्षी व कुक्कूट उत्पादने यांचा “नोव्हेल करोना विषाणू” प्रादुर्भावाशी कोणतही सबध नाही. आपल्याकडे चिकन व मटण उकळून शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे कुक्कूट मांस व कुक्कुट उत्पादने मानविय आहारामध्ये वापरण्यासाठी पुर्णपणे सुरक्षीत असुन नागरीकांनी अश्या अफवांकडे दुर्लक्ष्य करावे व या बाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.


 “नोव्हेला करोना विषाणू” हा सांसर्गिक असुन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस संक्रमीत होतो. तथापी कुक्कुट पक्षामधील करोना विषाणू (इन्फेक्शीअस ब्राँकायटीस) मानवामध्ये संक्रमीत होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. कुक्कुट मांस व कुक्कूट उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये “नोव्हेल करोना विषाणू” संक्रमीत झाल्याचे संदर्भ नाहीत. तरी ग्राहकांनी सोशल मेडीया, फेसबुक व व्हॉट्सअप इत्यादी माध्यमातील विपर्यास केलेल्या माहिती, बातम्या व  अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या कडील कुक्कुट मांस व कुक्कूट उत्पादने यांचा “ नोव्हेल करोना विषाणू” शी संबध नाही व ती आहारात वापरण्यासाठी पुर्णतः सुरक्षीत असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी कळविले आहे


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
राज्यातील पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वय समितीची बुधवारी बैठक....आषाढीवारी बाबत होणार निर्णय
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image