मसूर मधील तिघांच्या दुचाकी जप्त   

मसूर मधील तिघांच्या दुचाकी जप्त   


कराड - संचारबंदी असताना विनाकारण चारचाकी वाहनातून रोड वर फिरणारे तिघांवर गुन्हे दाखल करून त्यांची मोटारकार जप्त करण्यात आली आहे.


गुन्हा रजिस्टर नंबर व कलम - 138/2020 भादवि 188,आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे कलम 51 (ब ) प्रमाणे फिर्यादी - अमोल जयवंत देशमुख पो. का. ब. नं.. 2490 पोलीस ठाणे. आरोपी शाहरुख रफिक मुल्ला, वाहिद फारुख मुल्ला, अमीर शकील पटेल सर्व रा मसूर (ता. कराड) हे आहेत. गुन्हा घडला तारीख वेळ ठिकाण- दिनांक 30.03.2020 रोजी 07.00 वा.चे सुमारास कांबीरवाडी ता. कराड गावचे हद्दीतील मसूर रेल्वे फाटकाजवळ सार्वजनिक ठिकाणी रोडवर.दाखल तारीख वेळ -दि.30.03.2020 रोजी 19.56 वाजता झाला आहे.


महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रतिबंध आपत्ती व्यवस्थापन चालू असल्याने मा. जिल्हा दंडाधिकारी सो .सातारा यांचेकडील आदेश क्रमांक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय सातारा क्रमांक डिसी /एम ए जी /2/एस आर /19/2020 अन्वये रोजी जारी केले आहेत तारीख 30.3 .2020 रोजी स्वतः सरकारी जीपमधून पेट्रोलिंग करीत असताना नमुद ठिकानी यातील आरोपी यांनी आपसात संगणमत करून आपले ताब्यातील टाटा इंडिका कार तिचा .क्र. एम. एच 04 बी. वाय. 2762 मधून वाजवी कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी रोडवर आपले तोंडास मास्क न लावता व सुरक्षित तेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी न घेता फिरून त्यांनी बेदरकारपणे मानवी जीवितास व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरविण्याचे घातक कृती करून शासनाच्या आदेशाचे उलंघन करताना मिळून आले आहे त्यांनी मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केली केले आहे म्हणून वगैरे मजकुराच्या खबरी वरून भादवि कलम 188,आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51(ब )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सर्व नागरिकांनी आवाहन की,जमावबंदी व सचांरबंदीचे पालन करावे. जे नागरिक शासन व प्रशासनांचे आदेशांचे पालन करणार नाहीत.त्यांचेवर पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार आहे.