पाटणला होणार १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय


पाटणला होणार १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय


कराड  - पाटण येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करुन या रुग्णालयामध्ये १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. असे रुग्णालय उभारण्याकरीता पाटण ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात कुठे जागा उपलब्ध आहे व कशाप्रकारे उपजिल्हा रुग्णालय उभे करता येईल यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत.


पाटण ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करण्याच्या हालचाली राज्यमंत्री शंभूराज देसाईंनी पुढाकार घेवून गतिमान केल्या असून १५ दिवसांचा कालावधी पुर्ण होण्याच्या अगोदरच सदर कामाला गती येऊ लागले आहे. शंभूराज देसाईंचे मागील पंचवार्षिकमध्ये राज्य शासनाकडे सातत्याने प्रयत्न सुरु होते. दोन महिन्यापुर्वी या विषयीच्या हालचाली गतीमान करुन ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर केले.


पाटण तालुका डोंगरी व दुर्गम असुन जनतेला आरोग्य सुविधा घेणेकरीता कराड किंवा सातारा येथील रुग्णालयाकडे जावे लागत असल्याने ही आरोग्य सुविधा पाटण तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालय करुन जनतेला मिळणेसाठी शंभूराज देसाई यांनी सकारात्मक प्रयत्न केला. ग्रामीण रुग्णालयाकरीता अस्तित्वात असणाऱ्या जागेंची तात्काळ मोजणी करुन उपजिल्हा रुग्णालयाचा आराखडा पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक व सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी तात्काळ तयार करावा अशा सुचना दिल्या आहेत.


रुग्णालयाची उभारणी झालेनंतर याठिकाणी तज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या नेमणूका करणेसंदर्भातही शासनाकडे पाठपुरावा सुरु असून पहिल्या टप्प्प्यामध्ये हे रुग्णालय कसे व कुठे उभे करावयाचे याचे नियोजन केले जात आहे. पाटण प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे आपापल्या खात्यांतर्गत जी मदत करता येईल ती मदत करत आहेत.


Popular posts
सेवा सोसायटीनी उद्योगाला कर्ज दिले तर प्रत्येक गाव सक्षम होईल 
Image
‘कृष्णा’च्या रोगनिदान प्रयोगशाळेला ‘कोविड-19’च्या टेस्ट करण्यास मान्यता....आता कराडमध्येच होणार कोरोना चाचणी; सातारा जिल्यातील एकमेव प्रयोगशाळा
Image
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हद्दीवर रोखलेला कोरोना अखेर कराडमध्ये दाखल झाला....वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांच्यावर कारवाई करावी...कोविड कक्ष उपजिल्हा रुग्णालयाऐवजी सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्याची मागणी
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित २१ हजार व्यक्तींचे कोरोना लढ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज...सबंधित जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या देणार 
राज्यातील पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वय समितीची बुधवारी बैठक....आषाढीवारी बाबत होणार निर्णय
Image