विद्यापीठात बुधवारी कुसुमाग्रजांविषयी व्याख्यान

विद्यापीठात बुधवारी कुसुमाग्रजांविषयी व्याख्यान


कोल्हापूर -  शिवाजी विद्यापीठात ‘कै. कवी कुसुमाग्रज स्मृतिदिन व्याख्यानमाले’अंतर्गत येत्या बुधवारी (दि. ११ मार्च) दुपारी १२ वाजता ‘कुसुमाग्रजांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व’ या विषयावर ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे (सांगली) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मानव्यविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील अध्यक्षस्थानी असतील. विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभाग सभागृहात हा कार्यक्रम होईल.


शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे.