कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील‌ उपविभागीय अधिकाऱ्यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक

कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील‌ उपविभागीय अधिकाऱ्यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक


 पुणे  : जिल्ह्यामध्ये  कोरोना विषाणूचा ( कोव्हीड 19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांची इन्सिडेंट कमांडर (Incident Commander) म्हणून नेमणूक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली.


            पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 व भारत सरकार, गृह मंत्रालय यांच्याकडील आदेशान्वये जुन्नर व आंबेगाव क्षेत्राचे सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी 9783802020, पुणे शहर व शिरुर क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख 8275006945, मावळ व मुळशी क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के 9922448080, खेड क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी संजय तेली 9405583799, हवेली क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर 9822873333, बारामती व इंदापूर क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे 8975524199, दौंड व पुरंदर क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड 9860258932, भोर व वेल्हे क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव 9850114447 या  सर्व उप विभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या क्षेत्रासाठी इनसिडेंट कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.