सातारा जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत करावेत - मंत्री बाळासाहेब पाटील


सातारा जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत करावेत - मंत्री बाळासाहेब पाटील


कराड - सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग श व इतर रस्ते  संदर्भात बैठक पार पडली. यामध्ये सातारा, रहिमतपूर, औंध, पुसेसावळी आणि इतर रस्त्यांच्या  कामात येणाऱ्या अडीअडचणी व अन्य विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सातारा जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत करावेत अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहेत.


यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिह, पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जयंत पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजभोज, बांधकाम पश्चिमचे कार्यकारी अभियंता उतुरे यांचेसह शासकीय अधिकारी उपस्थित होते.