५० जणांचे रक्तदान

५० जणांचे रक्तदान


 संभाजीनगर  - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासोबतच रक्ताचाही तुटवडा जाणवत असल्यामुळे भारतीय जैन संघटना, लायन्स क्लब गोल्ड आणि पूर्णवाद परिवाराने लायन्स ब्लड बँकेत आज ५० जणांनी रक्तदान केले. 


 कोरोनापासून काळजी घेण्यासाठी दोन दिवस चालणाऱ्या या शिबीरात महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार हे रक्तदान शिबीर आयोजित केले. विशेष म्हणजे एका तासाला सहा ते सात याप्रमाणे रक्तदात्यांना वेळ ठरवून देण्यात आली. त्यामुळे रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दीही झाली नाही. आयोजक, रक्तदाते आणि ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत प्रत्येकांमध्ये किमान एक मीटर इतके अंतर ठेवून सॅनिटायझर आणि नाश्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी ५०  जणांनी रक्तदान केले. दुसऱ्या दिवशी गुरू गोविंदसिंग नगर येथील लायन्स ब्लड बँकेत सकाळी नऊ ते सायंकाळी सहादरम्यान रक्तदान शिबीर सुरु राहिल, अशी माहिती आयोजकांनी दिली.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image