वीर जवानांचे औक्षण करून जन्मभूमीत स्वागत ......देशसेवा बजावून आलेल्या वीर जवानांची काढण्यात आली मिरवणूक

 वीर जवानांचे औक्षण करून जन्मभूमीत स्वागत ......देशसेवा बजावून आलेल्या वीर जवानांची काढण्यात आली मिरवणूक


सातारा - देशसेवेसाठी युध्दभूमीवर पाय रोवून उभे राहिलेल्या व सेवानिवृत्त होऊन जन्मभूमीत आलेल्या सातारा जिल्ह्यातील मराठा लाईट इन्पंâट्रीतील ३२ बहाद्दर वीर जवानांचे सातारकरांनी कृतज्ञतापूर्वक स्वागत केले. या जवानांची सातारकरांनी वाजतगाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढली. यावेळी ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. शिवकाळापासून लष्करी सेवेची व शौर्याची मोठी परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यातील ३२ जवान लष्करी सेवेतून निवृत्त होऊन आज साता-यात परतले.


मराठा लाईट इन्पंâट्रीतील या जवानांच्या स्वागताची सातारकरांनी जंगी तयारी केली होती. कोडोली (सातारा) येथील वेदांत अ‍ॅवॅâडमीने यासाठी पुढाकार घेतला होता. सकाळपासूनच सातारा बसस्थानक या ठिकाणी जवानांचे, कुटुंबीय नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नागरिक जवानांची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अकराच्या सुमारास सर्व जवानांचे खास वाहनांनी सातारा बसस्थानक या ठिकाणी आगमन झाले आणि सारा माहोलच राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारून गेला.


फटाक्यांच्या आतषबाजीसह 'भारतमाता की जय', 'वंदे मातरम', 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा बराचवेळ निनादत राहिल्या. यावेळी सर्व जवानांचे सुवासिनींनी औक्षण केले. लोकांच्या या भावनांच्या वर्षावात जवानांच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू दाटून आले. त्यानंतर जवानांची ट्रॅक्टर ट्रॉल्यांमधून बसस्थानक ते पोवई नाक्यावरील शिवतीर्थापर्यंत ढोलताशांच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली.


शिवतीर्थावर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जवानांनी त्यांना कडक सॅल्यूट ठोकला. त्यानंतर सर्वांचे पुष्पहार, पुष्पगुच्छ, सातारी वंâदी पेढे देऊन कृतज्ञतापूर्वक स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व जवानांनी खणखणीत आवाजात मराठा लाईट इन्पंâट्रीचे ‘मर्द आम्ही मराठे खरे, दुष्मनाला भरे कापरे’ हे प्रेरणादायी गीत सादर केले. कार्यक्रमास अ‍ॅवॅâडमीचे संस्थापक, माजी सैनिक मोहन चव्हाण, सुनील काटकर, राजे प्रतिष्ठानचे अमोल तांगडे, पत्रकार गजानन चेणगे, शंकर माळवदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


 


 


Popular posts
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image
सातारा जिल्ह्यात 21 रुग्णांची नोंद.... एकूण रुग्णांची संख्या 113
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image