कोरोनाच्या भितीने शेतावर थाटले संसार !


कोरोनाच्या भितीने शेतावर थाटले संसार !


जालना - राज्यात संचारबंदी झाल्याने व बालकांची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला संसार काही दिवस शेतात मांडावा असा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने बरेच कुटुंब शेताकडे संसार उपयुक्त साहित्य घेऊन जाताना दिसत आहे. 


कोरोना विषाणू रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी आणून प्रशासन विविध उपाययोजना करत असतानाच ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी चिमुकल्यासह नकोच गावात, आपला शेतच बरा असा विचार करत शेतात राहण्याचा मार्ग निवडला आहे. 


सध्या जगभरात कोरानाचेच पेव सुरू आहे. भोकरदन तालुक्यातील पारधसह अनेक गावातील सर्व दुकाने, व्यवसाय, कार्यालये बंद असल्याने गावात शुकशुकाट निर्माण झाला आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. गावात अद्याप कोरोनाचा दोन संशयित आढळले होते परंतु त्याचा अहवाल न्युगेट्यू आला असल्याचे समझते.


प्रशासन विविध प्रयत्न करत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच बरोबर ग्रामस्थही कोरोनाला प्रतिबंध केवळ स्वतःची काळजी घेणे हेच औषध म्हणून आपली सावधगिरी बाळगत आहे. राज्यात संचारबंदी झाल्याने व बालकांची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला संसार काही दिवस शेतात मांडावा असा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने बरेच कुटुंब शेताकडे संसार उपयुक्त साहित्य घेऊन जाताना दिसत आहे. 


शिवाय गावात बाहेर गावी राहणारे ग्रामस्थही आले असून त्यांच्या व संपर्कात येणाऱ्या नातेवाईक व ग्रामस्था दुर राहण्याचा सल्ला दिला आहे .


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश
जिल्हाधिकार्‍यांचा आदेश केराच्या टोपलीत  कराड शिक्षण महोत्सव चौकशीची मागणी