कराड येथील ३ अनुमानितांचा रिपोर्ट निगेटिव्ह, मॄत बाळाचाही रिपोर्ट निगेटिव्ह, सातारा १अनुमानित दाखल


कराड येथील ३ अनुमानितांचा रिपोर्ट निगेटिव्ह, मॄत बाळाचाही रिपोर्ट निगेटिव्ह, सातारा १अनुमानित दाखल


कराड : काल दि. 4 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे बाधीत रुग्णाच्या सहवासीत म्हणून 2 नागरिक व श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे एक नऊ महिन्याचे स्त्री जातीचे बाळ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या सर्व तीन रुग्णांचा कोरोना रिपोर्ट एन. आय. व्ही. पुणे यांनी निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे. या निगेटिव्ह रिपोर्टमध्ये 9 महिन्याच्या स्त्री जातीच्या मृत बाळाचा समावेश असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे.


तसेच बाधित रुग्णाच्या निकट सहवासित असल्याने कोरोनाचा अनुमानित रुग्ण म्हणून काल दि. 4 एप्रिल रोजी  सातारा जिल्ह्यातील 31 वर्षीय पुरुषाला जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या घशातील स्त्राव पुणे एन. आय. व्ही. येथे पाठविण्यात आला असल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.