शांत स्वभावाचा गजानन चेणगे


शांत स्वभावाचा गजानन चेणगे


प्रमोद उर्फ गजानन चेणगे यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!


गजानन चेणगे हे शांत स्वभावाचे असून अभ्यासू वृत्तीचे आहेत. एखादा विषय हाताळताना त्या विषयाच्या सखोल तळापर्यंत जाऊन विषयाची मांडणी सकारात्मक पध्दतीने करण्याचा दृष्टिकोन असल्यामुळे गजानन चेणगे सातारा जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील अग्रक्रमावरील नाव आहे. मसूर (ता. कराड) या ग्रामीण भागातून येऊन गजानन चेणगे यांनी पत्रकारिता सुरू केली. मसूर डेटलाइनवरून सुरू झालेली पत्रकारिता आजही तितक्याच तन्मयतेने सुरू आहे. कराडमध्ये एका दैनिकाच्या कार्यालयाचा कारभार स्वीकारून केलेले काम आजही कराड तालुक्याच्या पूर्ण स्मरणात आहे. नंतर ते सातारा येथील जिल्हा आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून काम करीत राहिले. यानंतर त्यांनी दैनिक सामनाच्या सातारा जिल्हा प्रतिनिधीपदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून आजतागायत सातत्याने ते दैनिक सामनासाठी विविध विषयांवर लेखन करीत आहेत.


पत्रकारितेचा घेतलेला वसा प्रामाणिकपणे पार पाडण्याचे काम गजानन चेणगे करतात, यात तीळमात्र शंका नाही. आपल्या विचारांशी बांधिलकी ठेवून सकारात्मक पत्रकारिता करत समाजातील विविध प्रश्न मिळालेल्या व्यासपीठावरून मांडण्याचा गजानन चेणगे यांचा सातत्याने प्रयत्न सुरू असतो. वास्तविक आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुक करावे म्हणून हा शब्दांचा कौतुक सोहळा. वास्तविक शब्दांपलीकडे मैत्री जपणारा हा माझा मित्र आहे. प्रामाणिकपणा किती असावा हे गजानन चेणगे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. हाती घेतलेले काम इमानेइतबारे करायचे, त्यात कोणतीही कसूर ठेवायची नाही हा गजानन चेणगे यांचा स्वभाव आहे.


अलिकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाचा वाढदिवस समजू लागला आहे. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखीचे व अनोळखी सर्वजण शुभेच्छा देत असतात. गजानन चेणगे यांच्या वाढदिवसाबाबत या निमित्ताने एक आठवण सांगावीशी वाटते. प्रत्येक वाढदिवसाला मी स्वतः फोन करून प्रथम शुभेच्छा देणाऱ्यापैकी एक परममित्र आहे.


असो. गेल्या अनेक वर्षांपासून गजानन चेणगे यांच्याबरोबर असणारे ऋणानुबंध असेच कायम राहावेत आणि  त्यांनी हाती घेतलेल्या कामात सातत्य कायम ठेवावे. पत्रकारितेमध्ये विविध विषयावर लिखाण करावे. याचबरोबर त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.


गोरख तावरे, कराड


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image