सातारा जिल्ह्यात नव्या अटी व शर्तीवर ग्रामीण क्षेत्रातील कंपन्या चालू ठेवण्यासाठी परवानगी

सातारा जिल्ह्यात नव्या अटी व शर्तीवर ग्रामीण क्षेत्रातील कंपन्या चालू ठेवण्यासाठी परवानगी


 सातारा :   साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमालीमधील तरतूदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार शेखर सिंह, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी सातारा यांनी जिल्हयात अत्यावश्यक सेवा विचारात घेऊन व Directorate of Industries Mumbai. चे परिपत्रक क्र.DI/corona-19/2020/B-6343 Dated 20/04/2020 अन्वये यापूर्वी औद्योगिक तसेच खाजगी क्षेत्रामधील कारखाने कंपन्या, चालू करण्याबाबत यापूर्वी पारित केलेले आदेश वैध राहतील. तसेच  सातारा जिल्हयातील ग्रामीण क्षेत्रामधील सर्व कंपन्या, (ओगलेवाडी ता.कराड परिसर, तसेच नगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रातील वगळून) इत्यादींना चालू ठेवण्यासाठी खालील अटी व शर्तीवर नव्याने परवानगी देणेत येत आहे.


 (      महाराष्ट्र शासन, अधिसूचना क्र.DMU/2020 /CR.92/DisM-I, Dated 17 th April 2020 नुसार The relaxation refered in para 15 Clause can be availed by the industrial unit by way of informing Pintimating to the government on the website http://pemission.mideindia.org/ and by submitting a self-certification regarding the observation of condition through this website. )या  ठिकाणी para 15 Clause मध्ये नमूद केलेल्या सर्व कंपन्यांनी   त्यांचेबाबत योग्य व कायदेशीर माहिती भरणे आवश्यक आहे.


         विशेष आर्थिक क्षेत्र, निर्यात करणारे उदयोग, औद्योगिक वसाहती, औद्योगिक संस्था, उत्पादन उद्योग किंवा इतर औद्योगिक आस्थापना यांनी आपल्या कामगारांची कंपनीच्या आवारातच राहण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी.


         ज्या उद्योग घटकांनी (http://permission.midcindia.org/ ) पोर्टल वरुन माहिती भरली असेल व त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वाहतूकीसाठी वाहनांच्या परवानगीसाठी अर्ज केला असेल, अशा उद्योग घटकांनी वाहन व त्यामध्ये प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एक गट (उदा. बस क्रमांक MIL-11- 1234 व त्याच बसमध्ये प्रवास करणारे 10 कर्मचारी यांचा) तयार करावा. अशा गटांची यादी, पोर्टलवरुन जनरेट झालेले Self declaration व पोर्टलवरील मंजूर केलेल्या Vehicle Pass त्या क्षेत्रातील प्रांताधिकारी यांचेकडे जमा करावी. व त्याची पोहच घेतल्यानंतर प्रत्येक वाहनावर अशा गटांची माहिती दर्शनी भागावर लावावी. तद्नंतरच कर्मचाऱ्यांची ने-आण (वाहतूक) करावी. उद्योग  घटकांनी आदेशाप्रमाणे जे गट तयार केलेले आहेत त्या गटानुसारच कर्मचारी प्रवास करतील अशी व्यवस्था करावी. इतर कोणत्याही गटातील कर्मचारी दुसऱ्या गटात प्रवास करणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच वाहनाचा वापर करतांना प्रत्येक बाकडयावर एकच व्यक्ती बसविता येईल. अशा कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची नोंदवही ठेवावी ज्यामध्ये प्रवास केलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव, वाहनात चढण्याची वेळ, चढण्याचे ठिकाण, उतरण्याची वेळ, उतरण्याचे ठिकाण नमूद केलेले असावे, या नोंदवहीमध्ये फक्त वाहनाच्या वाहकाने वरील माहिती नोंदवावी.


        शिप्ट चालू होते वेळेस व संपताना, लघु व दिर्घ सूट्टीच्या वेळेस कामगारांना एकाच वेळेस सोडू नये. त्यासाठी सोशल डिस्टन्सींगचा वापर करुन या सर्व कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काम करण्यासाठी व वावरण्यासाठी वेळ द्यावी.


         शहरी भागातून ग्रामीण भागात कोणतीही वाहतूक करता येणार नाही किंवा शहरी भागातून ग्रामीण भागात कोणताही कामगार,कर्मचारी जाणार नाही याची दक्षता घ्यावी. (उदा.सातारा शहरातून सातारा MIDC)


         कंपनीने महाराष्ट्र शासन यांचेकडील अधिसूचना दि.17/04/2020 मधील परिशिष्ट 1 व 2 मध्ये नमूद केलेल्या मानक कार्यप्रणाली नुसार अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे.


        या उद्योगांना मंजूरी आजमितीस सातारा जिल्हयातील रहिवास असलेल्या अधिकारी,कर्मचारी,कामगार यांच्यासाठी असून, नव्याने परजिल्हयातील अधिकारी,कर्मचारी,कामगार कामावर येणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीची राहील.


        या वेबसाईटवर भरलेली माहिती हि चूकीची किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास तसेच संबंधित कंपनीने वरीलप्रमाणे अटी व शर्तीचे पालन न केल्यास फौजदारी गुन्ह्यास पात्र राहील याबाबत या आदेशाने कंपनीच्या व्यवस्थापनाला व कार्यकारी संचालकाला जबाबदार धरण्यात येईल. '


        या आदेशाचे उल्लंघन अथवा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्था