मलकापूर  शहरात "जनता कर्फ्यू"100% प्रतिसाद : मनोहर शिंदे


मलकापूर  शहरात "जनता कर्फ्यू"100% प्रतिसाद : मनोहर शिंदे


कराड - देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी देशांतर्गत कोरोना विषाणूवर नियंत्रण करणे व विषाणूचा प्रादुर्भाव वाढू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपायोजना आखण्यात आली असुन त्यानुसार दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन करणेत आलेले आहे. यामधुन जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उदा. किराणा, भाजीपाला, फळे, दूध, औषध दुकाने यांना वगळणेत आलेले आहे. तथापि कोरोना विषाणूची साखळी खंडीत करणेच्यादृष्टीने मलकापूर नगरपरिषदेने कडक उपाययोजना म्हणून प्रति मंगळवारी संपूर्ण लॉकडाऊन करणेचे निश्चित केलेले आहे. 


त्याअनुषंगाने मंगळवार दिनांक 31/03/2020 रोजी सकाळी 7.00 ते रात्री 9.00 या वेळेत मलकापूर शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या (किराणा, भाजीपाला, फळे, दूध, व औषध दुकान) यासह पूर्णपणे लॉकडाऊन करणेचा निर्णय घेणेत आल्याप्रमाणे तसेच याबाबत कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी सर्व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारीवृंद यांनी मंगळवार दिनांक 31 मार्च 2020 रोजी संपूर्ण मलकापूरमध्ये "जनता कर्फ्यू" पाळण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. 


या विषाणूच्या आजाराचे गांभिर्य मलकापूर नगरपरिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी "जनता कर्फ्यू" पाळण्याबाबत मंगळवार दिनांक 31 मार्च 2020 रोजी सर्वांना केलेल्या आवाहनाला 100% प्रतिसाद मिळालेला आहे. 


मलकापूर शहरामध्ये जीवनावश्यक वस्तू घेणेसाठीसुध्दा नागरिकांनी बाहेर न पडता या "जनता कर्फ्यू" ला प्रतिसाद दिला आहे. अशाच प्रकारे आपण स्वत: आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घेऊन कोरोना विषाणूचा संसर्ग टाळावा असे आवाहन नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा निलम येडगे, महिला बालकल्याण समिती सभापती आनंदी शिंदे,मुख्याधिकारी संजीवनी दळवी, यांनी केले आहे. 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कराडचा 35 वर्षीय तरुण कोरोना बाधितासह जिल्ह्यात 3 कोरोना बाधित; 18 रिपोर्ट निगेटिव्ह.....2 एप्रिल रोजी सायं. 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड19 ) आकडेवारी
Image
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निधीसाठी प्रस्ताव 
Image
शहरी व ग्रामीण क्षेत्रातील कंपन्यांना...अटी व शर्तीवर उद्योग सुरु करण्यास परवानगी...जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image