राजेंद्रसिंह यादव यांनी 1000 गोरगरीब कुटुंबीयांना दिले जीवनावश्यक साहित्याचे किट 


राजेंद्रसिंह यादव यांनी 1000 गोरगरीब कुटुंबीयांना दिले जीवनावश्यक साहित्याचे किट 


कराड - सामाजिक बांधिलकी जोपासत कराड नगरपरिषदेचे गट नेते राजेंद्रसिंह यादव बाबा यांनी आज 1000 गोरगरीब कुटुंबातील सदस्यांना जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप केले,या वेळी कराड शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील,मुख्याधिकारी यशवंत डांगे,अर्बन बॅक चे दिलीप गुरव साहेब,संदीप पवार,नगरसेवक विजय वाटेगावकर, हणमंत पवार,किरण पाटील,गजेंद्र कांबळे,स्मिता हुलवान, बाळासाहेब यादव,निशांत ढेकळे,बापू देसाई,यांची प्रमुख उपस्थिती होती.


देशात कोरोनाचे मोठे संकट आले असून गेली अनेक दिवस उद्योग धंदे बंद आहेत,देशात 21 दिवसासाठी लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे, अशा परिस्थितीत गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये या साठी या किटचे वाटप करण्यात आले, एकूण 2000 गोरगरीब कुटुंबात हे किट वाटण्यात येणार आहे ,एकंदरीत किट हे घरपोच केले जाणार आहे,या साठी आपण राजेंद्रसिंह यादव बाबा मित्र परिवार याच्या कडे संपर्क करायाचा आहे.


कराड शहरातील जनतेसाठी सदैव तप्तर असून कोरोनाचे संकट जात नाही तो पर्यंत कराड स्वच्छ व सुरक्षित कसे राहील या साठी प्रयत्न शील राहणार असल्याचे देखील यादव यांनी सांगितले कोरोना ला हरविण्या साठी आपण लॉक डाऊन चे नियम पाळून कराड शहर वाशियांनी आपल्या कुटुंबात राहून सुरक्षित राहण्याचे आवहान राजेंद्रसिंह यादव यांनी केले
किट वाटप झाल्यानंतर गोरगरीब जनतेने राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराला धन्यवाद दिले.