अंगणवाडी ताईंच्या सुरक्षेसाठी 1000 मास्क कृष्णा उद्योग समूह व अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचा उपक्रम


अंगणवाडी ताईंच्या सुरक्षेसाठी 1000 मास्क
कृष्णा उद्योग समूह व अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचा उपक्रम


कराड, : कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावातही ग्रामीण आरोग्यासाठी कार्यरत असणार्‍या अंगणवाडी ताईंच्या सुरक्षेसाठी कृष्णा उद्योग समूह व अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्यावतीने 1000 मास्क पुरविण्यात आले आहेत. कराड पंचायत समितीचे महिला व बालविकास प्रकल्पाधिकारी विशाल कोतागडे यांच्याकडे हे मास्क सुपूर्द करण्यात आले असून, त्यांच्या कार्यालयामार्फत गावागावात कार्यरत असणार्‍या अंगणवाडी ताईंना या मास्कचे वितरण केले जाणार आहे.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावपातळीवर अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कर्मचारी कार्यरत आहेत. या सेविका गावातील घराघरांत जाऊन सर्व्हेक्षण करत असून, परदेशातून तसेच दिल्ली, मुंबई, पुणे या भागातून गावी आलेल्या लोकांच्या प्रत्यक्ष नोंदी करत आहेत. तसेच या व्यक्तींना दररोज भेटून त्यांना सर्दी, ताप, खोकला यासह अन्य काही लक्षणे आढळतायत का, याचीही विचारपूस करावी लागत आहे. इतकी गंभीर स्वरूपाची जोखीम पत्करणार्‍या या अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मात्र पुरेशा प्रमाणात मास्क पुरविण्यात न आल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे.


या पार्श्‍वभूमीवर कृष्णा उद्योग समूह व अतुल भोसले युवा प्रतिष्ठानने या सेविकांसाठी 1000 मास्क उपलब्ध करून दिले आहेत. निवास मोहिते, सचिन शिंदे व सुधाकर कापूरकर यांच्यामार्फत कराड पंचायत समितीचे महिला व बालविकास प्रकल्पाधिकारी विशाल कोतागडे यांच्याकडे हे मास्क सूपूर्द करण्यात आले. लवकरच हे मास्क गावागावात कार्यरत असणार्‍या अंगणवाडी ताईंना वितरित करणार असल्याची माहिती श्री. कोतागडे यांनी यावेळी दिली. कृष्णा उद्योग समूह व अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कराडचा 35 वर्षीय तरुण कोरोना बाधितासह जिल्ह्यात 3 कोरोना बाधित; 18 रिपोर्ट निगेटिव्ह.....2 एप्रिल रोजी सायं. 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड19 ) आकडेवारी
Image
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निधीसाठी प्रस्ताव 
Image
शहरी व ग्रामीण क्षेत्रातील कंपन्यांना...अटी व शर्तीवर उद्योग सुरु करण्यास परवानगी...जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image