जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कराड शहरसह तालुक्यात एकूण 101 गुन्हे दाखल

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कराड शहरसह तालुक्यात एकूण 101 गुन्हे दाखल


कराड - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यतील  अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे  आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार ज्यांनी या नियमांचा भंग केला अथवा दुर्लक्ष केले त्यांच्यावर कराड तालुक्यात कारवाई करण्यात आले आहे. कराड शहर व कराड तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.


नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाचे पालन सर्वांनी करणे बंधनकारक आहे. दरम्यान या आदेशाचा भंग अथवा या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार व वेळेनुसार जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने चालू ठेवावेत.


Covid अनुषंगाने पारित आदेशाचे उल्लंघन केलेबाबत कराड तालुक्यात एकूण 101 गुन्हे व 4 न्यायिक खटले दाखल करण्यात आले आहेत. कराड शहर पोलीस स्टेशन -- 21 ( अधिक 4 न्यायिक खटले ), कराड ग्रामीण पोलीस स्टेशन - 21, उंब्रज पोलीस स्टेशन - 51, तळबीड पोलीस स्टेशन - 8 असे एकूण 101 गुन्हे व 4 न्यायिक खटले दाखल करण्यात आलेले आहेत.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image