13 अनुमानिंतांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह


13 अनुमानिंतांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह


कराड : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 9 तसेच उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 4 अशा एकूण 13 अनुमानित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या कोरोनाबाधिताच्या निकट सहवासित 13 नागरिकांचे 14 दिवसानंतरच्या पुर्नतपासणीसाठी घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही  डॉ.  गडीकर यांनी दिली आहे.


क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा 14 दिवसांनंतरचा घशातील स्त्रावाचा दुसरा नमुना बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे पाठविण्यात येत असल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.