व्हिसा उल्लंघन प्रकरणी 156 परदेशी नागरिकांवर गुन्हे

 


व्हिसा उल्लंघन प्रकरणी 156 परदेशी नागरिकांवर गुन्हे


मुंबई : कोरोना प्रतिबंध करण्यासाठी राज्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. या काळात व्हिसा उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस विभागाने १५६ परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


या १५६ विदेशी नागरिकांच्या विरोधात Foreigner’s Act section 14B व भारतीय दंड विधान कलम १८८, २६९, २७० नुसार गुन्हे नोंदविले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती, नांदेड, नागपूर, पुणे, अहमदनगर, चंद्रपूर व गडचिरोलीमध्ये हे एकूण १५ गुन्हे नोंदविले आहेत.


हे सर्व परदेशी नागरिक पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आले आहेत. ते व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करून निजामुद्दीन, दिल्लीच्या मरकजमध्ये सहभागी झाले होते. या परदेशी नागरिकांमध्ये कजाकस्तान - ९, दक्षिण आफ्रीका - १, बांगलादेश - १३, ब्रूने - ४, आयवोरियन्स - ९, इराण - १, टोगो - ६, म्यानमार - १८, मलेशिया - ८, इंडोनेशिया - ३७, बेनिन - १, फिलीपीन्स - १०, अमेरिका - १, टांजानिया - ११, रशिया - २, जिबोती - ५, घाना - १, किर्गिस्तान - १९ या देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांना इन्स्टिट्युटनल कॉरंटाईनमध्ये ठेवले आहे.