रुग्णांवर प्राथमिक उपचार करा; कोव्हिड 19 ची लक्षणे दिसल्यास प्रशासनाला कळवा : खाजगी डॉक्टरांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


रुग्णांवर प्राथमिक उपचार करा; कोव्हिड 19 ची लक्षणे दिसल्यास प्रशासनाला कळवा : खाजगी डॉक्टरांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


 सातारा : सध्या कोरोना विषाणू संसर्ग बाधित मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कोरोना विषाणूमधील लक्षणाच्या अनुषंगाने एखादा रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचाराचासाठी दाखल झाला तर साथरोग प्रतिबंध कायद्यामधील तरतूदीनुसार अशा रुग्णांवर प्राथमिक उपचार करणे खाजगी रुग्णालयांच्या डॉक्टरांना बंधनकारक आहे.


तसेच उपचाराकरीता दाखल होणाऱ्या रुग्णांमधील एखाद्या रुग्णामध्ये कोरडा खोकला, ताप, घसा दुखणे, श्वसनाचा त्रास सर्दी इ. कोरोना विषाणूची लक्षणे दिसल्यास त्या रुग्णाबाबतची सविस्तर माहिती संबंधित तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्राथमिक आरोगय केंद्रातील अधिकारी यांना तात्काळ लेखी स्वरुपात देणे आपणावर बंधनकारक राहील. या सुचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित खाजगी डॉक्टरांविरुध्द साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image