कराड येथे एकत्रित नमाज पठण प्रकरणी 26 जणांवर कारवाई.....डिस्टन्सिंगचे उल्लघंन केल्याप्रकरणी १५ हजारांचा दंड 


कराड येथे एकत्रित नमाज पठण प्रकरणी 26 जणांवर कारवाई.....डिस्टन्सिंगचे उल्लघंन केल्याप्रकरणी १५ हजारांचा दंड 


कराड : गोटे (ता. कराड) येथील एका घरात २० जण व शिवाजी स्टेडियम कराड येथे ६ जण एकत्रित नमाज पठण करत असल्याची माहीती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. या दोन्ही घटनेतील एकूण २६ जणांकडून १५ हजार रूपयांची दंडीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता संचारबंदी आदेश लागू असताना गोटे (ता. कराड) येथे फैय्याज अब्बास मुतवल्ली (वय- ४८,) यांच्या घरात जमून नमाज पठण करत असल्याची माहिती मिळाली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लघंन करून आल्याचे आढळून आल्याने फैय्याज मुत्तवल्ली, आब्बास लाल मुत्तवल्ली (वय-७६), साहिल सिराज मुलाणी (वय-२०), शाहिद दिलावर संदे (वय-३८), सोहेल फय्याज मुतवल्ली (वय-२०), अजरूद्दीन दिलावर संदे (वय-२८), तौफिक अजीज शेख (वय-५२), जावेद दिलावर संदे (वय-३०), रियाज अब्दुल शेख (वय-३०), करीम रसूर सुतार (वय-६५), जमीर करीम सुतार (वय-३४), अमिर बाळू सुतार (वय-३०), सद्दाम यासिन मुल्ला (वय-२६), शहारूख अब्दुल शेख (वय-२२), जमीर बाळू शेख (वय-२९), सलीम मुबारक मांगलेकर (वय-३८), बाळू अब्बास सुतार (वय-२५), ताज्जुद्दीन रसूल मांगलेकर, राजू करीम सुतार (वय-२९), दिलावर रसूल संदे (वय-५२, सर्व रा. गोटे, ता. कराड) यांच्यासह शिवाजी स्टेडियम येथे अल्ताफ हमीद सय्यद (वय-४०) यांच्या घरात त्याच्यासह मोहम्मद साहेबलाल पटेल (वय-२७), रहिमान मेहबुब साहब सिंदगीकर (वय-२४), अस्लम मेहबुब साहब सिंदगीकर (वय-२८), सुहेल पाज्जुद्दीन सय्यद (वय-२१), अमिर अख्तर मणेर (वय-२१, सर्व रा. शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी,कराड) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.


उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील याच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक विजय गोडसे, पोलिस हवालदार योगेश भोसले, संजय जाधव, होमगार्ड ए. पी. पुस्तके, तानाजी शिंदे, प्रफुल्ल गाडे, संतोष माळी यांनी कारवाई केली.