सातारा 3 व कराड 1 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल..एका महिलेचा रिपोर्ट निगेटिव


सातारा 3 व कराड 1 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल..एका महिलेचा रिपोर्ट निगेटिव


कराड :    दिल्ली निज्जामुद्दीन येथील तबलगी येथे झालेल्या कार्यक्रमामधून सातारा जिल्ह्यातील दोन नागरिक, परदेश प्रवास करुन आलेला एक नागरिक वय वर्ष 20 यांना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.


 तसेच नेपाळ वरुन प्रवास करुन आलेल्या 48 वर्षाच्या महिलेला  अनुमानित म्हणून कृष्णा हॉस्पिटल, कराड येथील विलगीकरण कक्षात अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन. आय. व्ही. पुणे   पाठविण्यात आले आहेत तसेच कृष्णा हॉस्पिटल येथे अनुमानित दाखल असलेल्या 48 वर्षीय महिलोचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.