कोरोना : 30 जणांची रिपोर्ट निगेटिव्ह तर 3 अनिर्णीत आज 109 जण दाखल


30 जणांची रिपोर्ट निगेटिव्ह तर 3 अनिर्णीत आज 109 जण दाख 


सातारा   : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 21, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 4,  उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 1 असे एकूण 30 जाणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून सातारा येथील 2 व कराड येथील 1 असे एकूण 3 नागरिकांचे अहवाल अनिर्णित असल्याचे बी.जे. वैद्यकीय माविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


                आज 24 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 12, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 24, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 40 फलटण येथे 2 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 31 असे  एकूण 109 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या एका बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेला नमुना निगेटिव्ह आल्याने आज पुनर्तपाणीकरिता तसेच कराड येथे दाखल असणाऱ्या बाधित रुगणाचा 14 दिवसानंतरचा पहिला नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.