कोरोना : 30 जणांची रिपोर्ट निगेटिव्ह तर 3 अनिर्णीत आज 109 जण दाखल

 


कोरोना : 30 जणांची रिपोर्ट निगेटिव्ह तर 3 अनिर्णीत आज 109 जण दाखल


सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 21, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 4,  उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 1 असे एकूण 30 जाणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून सातारा येथील 2 व कराड येथील 1 असे एकूण 3 नागरिकांचे अहवाल अनिर्णित असल्याचे बी.जे. वैद्यकीय माविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


                आज 24 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 12, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 24, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 40 फलटण येथे 2 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 31 असे  एकूण 109 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या एका बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेला नमुना निगेटिव्ह आल्याने आज पुनर्तपाणीकरिता तसेच कराड येथे दाखल असणाऱ्या बाधित रुगणाचा 14 दिवसानंतरचा पहिला नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image