परराज्यातील मजूर, कामगारांनी संयम ठेवावा राज्य सरकार पूर्णपणे काळजी घेत आहे.-----परिस्थितीचे राजकारण न करता एकत्र लढा देऊत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


परराज्यातील मजूर, कामगारांनी संयम ठेवावा

राज्य सरकार पूर्णपणे काळजी घेत आहे.-----परिस्थितीचे राजकारण न करता एकत्र लढा देऊत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : केंद्र आणि राज्याने लॉकडाऊन वाढवला आहे पण यात काही आम्हाला आनंद नाही. आपल्याला घरी जाण्याची ओढ असणे स्वाभाविक आहे पण थोडा संयम ठेवा, राज्य सरकार तुमची संपूर्ण काळजी घेत आहे, आणखीही काही यासाठी करावे लागले तर केले जाईल मात्र कुणी या लढाईमध्ये राजकारण करून गैरसमज पसरवू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्ह प्रसारणात सांगितले. ते म्हणाले की कोरोनाचा मुकाबला करण्यात केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य देत असून विविध पक्षांचे नेतेही बरोबर आहेत.

वांद्रे येथे दुपारी परराज्यातील कामगार, मजूर यांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली होती त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की रेल्वे  सुरु होणार अशा अफवेने लोक जमले. मात्र अस्वस्थ होण्यासारखे काही नाही. तुम्ही आपल्या राज्यात नसलात तरी आपल्याच देशात आहात. आणि तुमची संपूर्ण काळजी घेतली जाईल. या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणी भावनांशी खेळण्याचे राजकारण केले तर सहन केले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन केले तसेच लाखो भीमसैनिकआणि  नागरिकांनी देखील घरात राहूनच या महामानवाला अभिवादन केले. कुठेही गर्दी केली नाही आणि एरव्ही मोठ्या धुमधडाक्यात साजरा करणरी ही जयंती आपण साधेपणाने साजरी केली त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा दिला आणि आज आपण विषाणूंशी लढा देतो आहोत असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज सकाळी पंतप्रधानांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला. शनिवारीच मी याची मुदत वाढवली. हा लढा अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता. सर्व जनतेने जिद्द, संयमाचे दर्शन आत्तापर्यंत घडवले आहे आणि पुढेही आपण घडवाल अशी खात्री आहे.

कोरोनाशी कशा पद्धतीने मुकाबला सुरु आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

एकट्या मुंबईत २० ते २२ हजार चाचण्या झाल्या आहेत. २३० जणांवरआपण उपचार करून पाठवले आहे. ३२ गंभीर आहेत पण त्यांच्या तब्येती स्थिर आहेत. एका ६ महिन्याच्या बाळाच्या आईशी आणि ८३ वर्षांच्या एका कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेशी मी आज सकाळी बोललो. दोघांनीही कोरोनाला हरवले आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले.

जवळपास १० जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा प्रवेश झाला नाही. उर्वरित राज्यातून त्याला हद्दपार करायचे आहे.  मुंबई -पुण्यात चाचण्यांची संख्या वाढवतो आहोत. बाधित क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काही झोन्समध्ये थोडी गैरसोय झाली असेल पण ती तात्पुरती आहे, आपण अन्नधान्याचा पुरवठा सुरळीतपणे सुरु केला आहे.असेही ते म्हणाले.  .

आज जगभर टंचाई आहे पण  वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा वाढविण्याचा आमचा  प्रयत्न  सुरु आहे. अनेक व्यक्ती, संस्था आपल्याला मदत करताहेत. कुणी पीपीई कीट देताहेत, कुणी व्हेटीलेटर देताहेत. वैद्यकीय क्षेत्रातील २१ हजार लोकांनी आमच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे असेही ते म्हणाले.  आता तर या युद्धात सर्व नामवंत डॉक्टर्स आमच्या बरोबर सहभागी झाले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टर्सचा टास्क फोर्स राज्यातील डॉक्टर्सना मार्गदर्शन करणार आहे.

मालेगावमध्ये राहणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना मी या आजच्या निमित्ताने विनंती करतो की कृपया प्रशासनाला सहकार्य करा, तुम्हालाही या कोरोनाने किती मृत्यू जगभर झालेत त्याची कल्पना आहे.  मी मुल्ला , मौलवी यांच्याशीही बोलतोय. मी सांगू इच्छितो की हा रोग जात पात धर्म पाहत नाही. तुम्ही संकटात पडू नका आणि दुसऱ्यांना पाडू नका. प्रशासन तुमच्या चांगल्यासाठीच सांगते आहे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आज उद्योग- व्यवसाय प्रदीर्घ काळासाठी बंद करणे अर्थव्यवस्थेवर ताण आणण्यासारखे आहे. जिथे कोरोनामुळे बिकट परिस्थिती नाही अशा जिल्ह्यांत ज्या उद्योग , व्यवसायांना त्यांचे कामगार एकाच ठिकाणी ठेऊन, त्यांना तिथेच भोजन व्यवस्था देता येण्यासारखी असेल ते करणे शक्य असेल तर उद्योग सुरूही करता येतील असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  कोविड च्या बरोबरीने आर्थिक  संकटाचा मुकाबला करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गट स्थापन केला आहे. डॉ रघुनाथ माशेलकर, अजित रानडे, दीपक पारेख, विजय केळकर यांची देखील एक समिती स्थापन केली आहे . कमीतकमी आर्थिक दुष्परिणाम कसे टाळायचे , पुढील आर्थिक आघाडीवर कसे काम करायचे आहे तेही समिती पाहील.
२० एप्रिलनंतर कोणते उद्योग व्यवसाय सुरु करता येतील त्याचा निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले

 शेतकऱ्यांचा  खरीपाचा हंगाम येतो आहे. शेतीविषयक कामे , बियाणे-अवजारे यांची ये-जा थांबवणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहील  अर्धा एप्रिल संपला आहे. दीड महिन्यांनी पाउस सुरु होईल. पावसाळ्यात दुर्गम भागात जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, औषधे पुढच्या १५ -२० दिवसांत पोहचावा असे निर्देश दिले आहेत मग त्यात गडचिरोली , अक्कलकुवा, मेळघाट असेल अशी माहितीही त्यांनी दिली.

सध्या परराज्यातून आलेल्या कामगार व विविध उद्योगांतून काम करणारे श्रमिक अशा  ५ लाख ४४ हजार व्यक्तींची  राज्य सरकारने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. एकूण  ४ हजार ३४६ निवारा केंद्रे उभारली असून त्यातून त्यांना दोन वेळेसचे भोजन व सकाळचा नाश्ता दिला जातो. शिवाय त्यांच्यासाठी डॉक्टर ही नियुक्त केले आहेत. त्यांच्यातील नैराश्य कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात १३ दिवसात १.२५ कोटी कुटुंबांनी (८० टक्क्यांपेक्षा अधिक) धान्य खरेदी केले आहे.


Popular posts
ग्रामपंचायत जैवविविधता नोंदवहीत सातारा जिल्हा अग्रक्रमावर
Image
कराड वार्तापत्र - गोरख तावरे जनशक्ती आघाडीमध्ये बंड झाल्याने गटात गट निर्माण जानेवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या विविध समितींच्या सभापती निवडीच्या अनुषंगाने कराड नगरपालिका राजकारणात हालचालीस प्रारंभ झाला आहे. दरम्यान जनशक्ती आघाडीमध्ये उभी फूट पडली आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या गटाला स्वतंत्र बसण्यासाठी वेगळी जागा सभागृहात द्यावी, अशी मागणी केल्याने जनशक्ती आघाडीत फूट पडली. कराड नगरपालिकेच्या राजकारणातील गटात गट निर्माण झाल्याची चर्चा संपूर्ण शहरभर सुरू आहे. दरम्यान ऐतिहासिक कराड नगरपालिका राजकारणातील आघाड्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. यापूर्वीही अनेक वेळेला नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या विचाराच्या निवडून आलेल्या आघाड्यांमध्ये बंड झाले, फूट पडली अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना 25 विरुद्ध 24 अशी सदस्य संख्या होती. दरम्यान एका सदस्याने बंड पुकारून विरोधात गेल्यामुळे सत्ताधारी गट अल्पमतात आला होता. दरम्यान मुरब्बी राजकारणी असणारे पी. डी. पाटील यांनी एका दिवसात हे बंड मोडून काढले. आपला गेलेला सदस्य पुन्हा आपल्या गटात घेऊन आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या राजकारणामुळे कराड नगरपालिकेतील सत्ताधारी जनशक्ती आघाडीमध्ये फुट पडली असे बोलले जात आहे. नगरपालिका म्हटले की, गट-तट, आघाड्या, कुरबुडी, देणे घेणे असे सर्रास घडत असते. जनशक्ती आघाडी फुटली, नगरसेवक घेत असलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे फुटीचे राजकारण हा मुद्दा ऐरणीवर आला.कराड शहरासाठी विकास निधी राज्य शासनाकडून येतो. हा विकास निधी विविध कामावर खर्च करीत असताना कामाचा दर्जा बिलकुल नाही, ठेकेदार दर्जाहीन कामे करतात, हे अनेक कामे पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे. दर्जाहीन विकास कामे होत असल्याने नागरिकांची सातत्याने ओरड सुरू आहे. मात्र याकडे नगरसेवक अथवा प्रशासन गांभीर्याने पाहत नाही.यामुळे विद्यमान सत्ताधारी गटातील नगरसेवकांबद्दल नागरिकांच्या मनामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. मुख्य पदाधिकाऱ्यांसह सर्वच नगरसेवक कराड शहराच्या विकासाकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी गटात गट केलेला कायम राहणार का ? सभापतीच्या निवडीवेळी "तलवार म्यान" होणार का ? हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. कारण जयवंत पाटील उपनगराध्यक्ष झाल्यापासून सत्ताधारी गटाचा सर्व कारभार जयवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालला आहे. दरम्यान जयवंत पाटील यांनीच बंड पुकारल्यामुळे जनशक्ती आघाडीचे काय होणार ? असा सवाल उपस्थित होत आहे. जनशक्ती आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आणि उपनगराध्यक्ष जयंवत पाटील यांनी सभागृहात वेगळी बसण्याची मागणी केली. कराड नगरपालिका राजकारणाची दिशाच बदलली आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यामध्ये समेट घडावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. विविध समितीच्या सभापतीची निवड करण्याचा अधिकार कोणाला ? आघाडीच्या अध्यक्षांना का नगरपालिकेतील गटनेत्याला ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान विविध समितीच्या सभापती निवडीच्या अनुषंगाने आत्तापर्यंत राजेंद्र माने,महेश कांबळे, किरण पाटील यांना सभापती पदाची संधी मिळालेली नाही. यावेळेला सभापतीपदाची लॉटरी या तीन उमेद नगरसेवकांना लागेल का नाही ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कराडच्या नगरसेवकांची भूमिका संभ्रमावस्थेत राहिली होती. कोणत्या उमेदवाराला पाठिंबा कुणाला द्यायचा ? प्रचार कोणाचा करायचा ? याबाबत मात्र कराड नगरपालिकेतील नगरसेवकांचे लवकर एकमत झाले नाही. कराडच्या नगरसेवकांनी आपली भूमिका लवकर स्पष्ट केली नाही. विधानसभा निवडणुकीतील नगरसेवकांच्या भूमिकेबाबत कराडमध्ये आजही चर्चा सुरू आहे.कराड नगरपालिकेला निवडून येणार्‍या नगरसेवकांची भूमिका कराड शहराच्या विकासाबाबत संवेदनशील हवी, मात्र सध्या ती दिसून येत नाही.  नगरपालिका निवडणुकीनंतर कराड नगरपालिकेमध्ये राजकीय तीन गट अस्तित्वात आले. यामध्ये लोकशाही आघाडी विरोधात बसली आहे. भाजपाचे काही नगरसेवक निवडून आले त्यांचा एक गट आहे. त्याचबरोबर सत्ताधारी म्हणून जनशक्ती आघाडी कारभार पाहत आहे. तर भाजपच्या नगराध्यक्षा स्वतंत्रपणे आपला कारभार करीत आहेत. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या पाच नगरसेवकांचा वेगळा गट निर्माण केला आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचा गट म्हणजे गटात गट निर्माण झालेला आहे. जनशक्ती आघाडीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बरोबर आता इथून पुढे आपला "घरोबा" असणार नाही असे सांगून त्यांनी कराड नगरपालिकेचा कारभार सुरू केला आहे. यशवंत विकास आघाडीचे राजेंद्रसिंह यादव यांना मांणणारे नगरसेवक आहेत. मात्र राजेंद्रसिंह यादव हे नगरपालिका राजकारणात, नगरपालिका कारभार चालवण्यासाठी जेवढा वेळ द्यायला हवा, तेवढा वेळ देत नाही, त्यामुळे नगरसेवकांनी अडचणी कोणासमोर मांडायच्या ? हा प्रश्नच आहे. अशी एकाकी पडलेले नगरसेवक आता एकत्रित सर्वांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. याला किती प्रतिसाद मिळेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये गटातला गट शिल्लक राहतो का ? जनशक्ती आघाडीच्या छत्रछायेखाली निवडून आलेले सर्व नगरसेवक एकत्र राहणार का ? हे काही कालावधीनंतर स्पष्ट होईल.  जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विविध समितींच्या सभापतींची निवडणूक होणार आहे. यावेळी गटातला गट अथवा जनशक्ती आघाडीची काय रणनीती राहणार हे पहावे लागेल. कराडमधील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्यासोबत महेश कांबळे, कश्मिरा इंगवले, माया भोसले, अरुणा पाटील हे नगरेसवक असल्याचा दावा केला आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील हे भाजपचे डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक आहेत. तर राजेंद्रसिंह यादव गट श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक आहेत. त्यामुळेच आता नगरपालिका राजकारणात काय होणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नगरपालिका निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीचे 16 नगरसेवक विजयी झाले. तर या आघाडीला एका महिला नगरसेविकेने पाठिंबा दिला. दरम्यान निवडून आल्यानंतर प्रथम जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वासघात केला आणि त्यांचे नेतृत्व झुगारून दिले. कराड नगरपालिकेत भाजपाचे पाच, लोकशाही आघाडीचे सहा तर बहुमतात असलेल्या जनशक्ती आघाडीसह आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे कॉग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माने असे गट कार्यरत आहेत. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी राजीनामा द्यावा, असे बहुमतात असलेल्या जनशक्ती आघाडीतील काही नगरसेवकांचे म्हणणे होते. दरम्यान उपनगराध्यक्ष पाच वर्ष माझ्याकडे राहील" या अटीवर "उपनगराध्यक्षपद घेतले असल्याचे जयंतराव पाटील सांगतात. यामुळे उपनगराध्यक्ष बदलाचा प्रश्नच येत नाही. यशवंत आघाडी राजेंद्रसिंह यादव यांची, जनशक्ती आघाडी अरुण जाधव यांची तर लोकसेवा आघाडी जयवंतराव पाटील यांची आघाडी आहे. या तिघे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते. जयवंत पाटील यांच्याकडे उपनगराध्यक्षपद असल्यामुळे नगरपालिकेत दररोज जयवंत पाटील दिसतात. अरुण जाधव नगरपालिकेकडे फिरकतही नाहीत. तर राजेंद्रसिंह यादव आपल्या कामाचा व्याप सांभाळून, जेवढा वेळ देता येईल तेवढाच वेळ देतात. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ते कोण सोडवणार ? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
Image
५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका. 
Image
कोरोना लस संशोधन प्रकल्पात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर; पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लस विकसित
Image
जयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले
Image