सातारा जिल्ह्यात एकूण 4 कोरोना बाधित...आज 54 वर्षीय नागरिक कोरोना बाधीत...1 रिपोर्ट निगेटीव्ह... सातारा 4, कराड 7 नागरिक अनुमानित म्हणून दाखल


सातारा जिल्ह्यात एकूण 4 कोरोना बाधित...आज 54 वर्षीय नागरिक कोरोना बाधीत...1 रिपोर्ट निगेटीव्ह... सातारा 4, कराड 7 नागरिक अनुमानित म्हणून दाखल


कराड : काल 4 एप्रिल रोजी कोरोना अनुमानित म्हणून  जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या अनुमानित रुग्णांपैकी  एका 54 वर्षीय पुरुष नागरिकाचा कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.  याचबरोबर 31 वर्षीय युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा अहवाल पुणे एन.आय.व्ही यांनी कळविले आहे.  सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण 4 झाली असून आज सातारा  येथे  4 व कराड येथे 7 अनुमानित नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


कोरोना बाधित रुग्ण हा सातारच्या ग्रामीण भागातील असून वाळकेश्वर,मुंबई येथे मागील 14 वर्षापासून खाजगी कारचालक म्हणून एकटा राहत होता.  8 मार्च 2020 रोजी टेम्पोने गावी आला. दोन दिवसांपूर्वी  ताप व सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यास मधूमेहाचा त्रास असून त्यावर उपचार चालू आहेत. सद्यस्थितीत त्याची प्रकृती स्थिर असुन  त्यावर मार्गदर्शक सुचनानुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू आहेत.  या कोराना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व निकट सहवासितांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार मरकज काळात दिल्ली येथे भेट दिल्याने सातारा जिल्ह्यातील 25 ते 27 वयोगटातील 4 पुरुष नागरिकांना आज 5 एप्रिल रोजी कोविड- 19 अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.


कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 1 ते 85 वयोगटातील 5 पुरुष व  1 महिला अशा 6 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे  विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून यातील 30 वर्षाचा पुरुष हा कोरोना बाधित रुग्णांचा निकट सहवासित असल्याचे निदर्शनास आले आहे.  तसेच परदेश प्रवास करुन आलेल्या एका 67 वर्षीय पुरुषास देखील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.  या सर्व 11 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात येत असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.


 सध्या विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 2 कोरोना बाधित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने 14 दिवस पूर्ण झाल्याने तपासणीसाठी एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पोलंड येथे राहणाऱ्या आपल्या राज्यातील वनसगांवचे वैभव शिंदे यांनी लिहीलेली ही पोस्ट... मुद्दाम आपणा सर्वांसाठी वाचा आणि सगळ्यांना सांगा.... जीवन सुंदर आहे दक्षता घेऊ या...!
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
48 तासात बँकेत जमा झाली रक्कम.....शेतकऱ्यांना चैतन्य देणारी कर्जमुक्ती