धक्कादायक....श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे दोघांचा मृत्यू ....40 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल


धक्कादायक....श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे दोघांचा मृत्यू ....40 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल


कराड  :   क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 4 नागरिकांना बाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून तर 2 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे व प्रवास करुन आलेले 2 नागरिक आणि 1 आरोग्य कर्मचारी असे एकूण 9 जणांना तर कृष्णा मेडिकल, कॉलेज, कराड येथे बाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून 22 नागरिक व श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 7 नागरिकांना तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 4 असे एकूण 42 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 


यापैकी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 70 वर्षीय महिला व उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 32 वर्षीय पुरुष या दोघांचा मृत्यु  श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे झाला आहे. या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने संशयित म्हणून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित 40 नागरिकांच्या  घशातील स्त्रावांचे नमुनेही   बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image