कराडला तीन, चार एप्रिलला जनता कर्फ्यू... 48 तास कोणी घराबाहेर पडायचे नाही

 


कराडला तीन, चार एप्रिलला जनता कर्फ्यू... 48 तास कोणी घराबाहेर पडायचे नाही


कराड - शहरात तीन व चार एप्रिल रोजी जनता कर्फ्यू होत आहे. या दोन दिवसांच्या कालवधीत जीवनावश्यक सेवाही बंद राहणार आहे. त्यामुळे नागरीकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असेही आवाहन मुख्याधिकारी डांगे यांनी केले आहे.


कराड शहरातील जीवनाश्यक सेवेसह सर्वच व्यवहार लॉकडाऊन ठेवले जाणार आहेत. शहरात सध्याची स्थिती लक्षात घेवून नगरपालिकेने सदरचा निर्णय घेतला आहे. श्री. डांगे म्हणाले, शहरात नागरीकांना भाजीपाला, किराणा माल घरपोच दिला जात आहे. शहरातील नव्वद टक्के लोक संचारबंदीच्या नियमांचे पालन करून घरात बसतात. मात्र काही लोक विनाकारण संपूर्ण गावभर फिरत आहेत. अशा काही बेफिकीर नागरिकांच्या वागण्याने भविष्यात धोका होवू शकतो. याची गांभीर्याने दखल घेऊन आणि सद्दस्थिती लक्षात घेता कोरोनाला रोखण्यासाठी शहरात तीन व चार एप्रिलला "जनता कर्फ्यू"पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


पुणे, मुंबईसह परदेशातून आलेले नागरीक होम क्वारंटाईन केले आहेत. जिल्हा बंदी असल्याने अन्य जिल्ह्यातून येणारा ओघ कमी झाला असली तरी अद्यापही काही नागरीक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यांना सातत्याने सूचना देऊन ही ते ऐकत नाहीत. कराड मधील सर्व नागरिकांच्या निर्बंध असावा यासाठी कर्फ्येूचे आय़ोजन केले आहे असेही मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पोलंड येथे राहणाऱ्या आपल्या राज्यातील वनसगांवचे वैभव शिंदे यांनी लिहीलेली ही पोस्ट... मुद्दाम आपणा सर्वांसाठी वाचा आणि सगळ्यांना सांगा.... जीवन सुंदर आहे दक्षता घेऊ या...!
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
48 तासात बँकेत जमा झाली रक्कम.....शेतकऱ्यांना चैतन्य देणारी कर्जमुक्ती