5 महिन्याच्या बाळाचा मृत्यु ......1 अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह....जिल्ह्यात 41 अनुमानित दाखल 


 5 महिन्याच्या बाळाचा मृत्यु ......1 अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह....जिल्ह्यात 41 अनुमानित दाखल 


सातारा  - क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे दाखल असणाऱ्या एका अनुमानित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.


तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 1, बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आलेले 2 व सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित 9 तर कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 4, सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित 24 व उपजिल्हा जिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाचा निकट सहवासित 1 अशा एकूण 41 जणांना अनुमानित म्हणून आज विलगीकरण  कक्षात दाखल करण्यात आले आहे.  या 41  अनुमानितांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, कृष्णा मेडिकेल कॉलेज, कराड येथील अनुमानित रुग्णांमध्ये  5 महिन्याच्या पुरुष जातीच्या बाळाचा समावेश असून त्याचा मृत्यु झाला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
जयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
वर्धन अग्रोने ऊस बिल त्वरित द्यावीत अन्यथा आंदोलन... सचिन नलवडे यांचा इशारा
Image
कोल्हापूर, सांगली सातारा या जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भाबाबत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री श्री रमेश जारकीहोळी व महाराष्ट्र राज्याचे सहकार पणन मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांची बैठक
Image