मुंबईवरून आलेला 54 वर्षीय कोरणा बाधित "कोरोनामुक्त"... रुग्णालयातून दिली सुट्टी
सातारा -: मुंबई वरून आल्या नंतर पॉझिटिव्ह निघालेल्या 54 वर्षीय व्यक्तीचे 14 आणि 15 दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे आता तो कोरोना मुक्त झाला आहे. या व्यक्तीला क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून आज घरी सोडण्यात आले. डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून आणि टाळ्यांच्या गजरात त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.