शिवाजी विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावे - कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे


शिवाजी विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावे" - कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे


कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये/मान्यता प्राप्त संस्थाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी  तसेच, विद्यापीठ अधिविभागांंचे विभाग प्रमुख, संचालक, समन्वयक, शिक्षक आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, सेवक यांनी ‘कोरोना’ (कोव्हीड-१९) विरुधाच्या लढाईसाठी एक दिवसाचे वेतन मदतीच्या स्वरुपात मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे यांनी आज सोमवार, दि.३० मार्च रोजी केले आहे.


यावेळी पुढे ते म्हणाले, आपला देश आणि राज्य सध्या कोव्हीड-१९ कोरोना व्हायरसच्या अत्यंत गंभीर अशा संकटातून जात आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन कोरोना व्हायरसचा (कोव्हीड-१९) प्रकोप रोखण्याकरिता कठोर प्रयत्न करत आहेत.या कठीण प्रसंगी देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की, आपण आपल्या देशासाठी मोलाचे  योगदान दिले पाहिजे. याच भावनेतून आपण सर्वांनी मिळून आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता देण्यात यावे.


विद्यापीठाने विद्यापीठात शीव आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करून वेगळ्या आपत्ती वर मात करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केली आहे. कोव्हिड १e चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सुरुवातीपासूनच स्वच्छतेसंदर्भात विविध उपाययोजना केल्या असून, या विषाणूचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीद्वारे पसरू नये म्हणून शासनाच्या निर्देशानुसार  आपले शैक्षणिक अथवा प्रशासकिय काम घरी राहून (वर्क फ्रॉम होम) सर्व महाविद्यालये/मान्यता प्राप्त संस्थाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी  तसेच, विद्यापीठ अधिविभागांंचे विभाग प्रमुख, संचालक, समन्वयक, शिक्षक आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, सेवक   करावे असे कळविले आहे. 


तसेच अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यांच्या  निर्देशानुुसार  एक दिवसाचे वेतन देण्याबाबतही आवाहन केले आहे. तरी विद्यापीठाशी सर्व सबंधित घटकांनी एक दिवसाचे वेतन मदतीच्या स्वरुपात मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दयावे असे आवाहन करण्यात येत आहे.