सोशल डिस्टन्स व संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व मॉर्निंग वॉक करणाऱ्या 76 लोकांवर कराड पोलीसांकडून कारवाई... नावांसह पहा यादी


सोशल डिस्टन्स व संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व मॉर्निंग वॉक करणाऱ्या 76 लोकांवर कराड पोलीसांकडून कारवाई... नावांसह पहा यादी


कराड - संपुर्ण भारतभर व महाराष्ट्रात सुरू असलेल्या कोरोणा विषाणू संसर्ग रोखण्याकरीता संचारबंदी आदेश लागू असून लॉकडाऊन आदेश जारी आहेत. सदर अनुषंगाने संसर्ग रोखण्याकरीता पोलीस दल महत्वाची सेवा बजावत आहे. दि.06/04/2020 रोजी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत, वाखाण रोड, शिवाजी स्टेडियम रोड, मुख्य रस्ता, सर्व पेठेतील गल्ली बोळ रोड, विद्यानगर, ओगलेवाडी, बनवडी,आगाशिवनगर, मलकापूर, कार्वेनाका असे संपुर्ण शहरात वेगवेगळी पथके तयार करून हद्दीत मॉर्निंग गस्त करत असताना पहाटे मॉर्निंग वॉक करणारे 76 इसमांचेवर पोलीसांचेकडून कारवाई करणेत आलेली आहे. 


मा.जिल्हाधिकारी सो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक जा.क्र.डी.सी./एम.जी./02/एस.आर./22/ 2020 दिनांक 31/03/2020 रोजीचे आदेशानुसार संपुर्ण सातारा जिल्ह्यांत दिनांक 01/04/2020ते दिनांक 14/04/2020 या कालावधित सी.आर.पी.सी. 144 कलम लागू करुन संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू गेलेले आहेत.नमुदचे आदेश हे संचारबंदीचे असून कोवीड -19 कोरोनो विषाणू संसर्ग रोखण्याकरीता आदेशीत केलेले आहेत. काही लोक संचारबंदी आदेश लागू आहेत यांची जाणीव असताना सुध्दा सोशल डिस्टन्सचे उल्लघंन करुन फिरत असल्याचे मिळून आलेले आहेत. 


असे एकुण 76 लोकांचे विरुध्द भा.द.वि.स.कलम 188 सह कोविड 19 उपाय योजना 2020 चे कलम 11 प्रमाणे सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम -51(ए) प्रमाणे अपराध केल्याचा सरकातर्फे खटला तक्रार मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो यांच्या कोर्टात सादर केला असता आजरोजी महावीर जयंतीची मा. कोर्टास सुट्टी असलेने त्याची सुनावणी उदयीक दि.07/04/2020 रोजी सकाळी 11.00 वा. ठेवलेली आहे. तसेच खालील संचार बंदीचे उल्लंघण करणाऱ्या लोकांना उदयीक दिनांक 07/04/2020 रोजी सकाळी 10.30 वा. मा.कोर्टात हजर राहण्याची समज दिलेली आहे. 


सदर मॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमांची नावे खालील प्रमाणे 
1. चैतन्य प्रदिप पाटणकर वय-24वर्षे रा.185,सोमवार पेठ,कराड 
2. दिग्विजय प्रदिप पाटणकर वय-27वर्षे रा.185,सोमवार पेठ,कराड 
3. अजयकुमार राजाराम मालगावकर वय-57वर्षे रा.रुक्मिनीपार्क कराड 
4. रमेश आकाराम चव्हाण वय-60वर्षे रा.मंगळवार पेठ,कराड 
5. विष्णू रामचंद्र शिंदे वय-58वर्षे रा.बुधवार पेठ,कराड 
6. रमजान मदार पखाले वय-52वर्षे रा.भोई गल्ली कराड 
7. शरद आण्णासो चव्हाण वय-55वर्षे रा.कार्वेनाका कराड 
8. अरुण शंकर पवार वय-54वर्षे रा.मंगळवार पेठ, कराड 
9. सुनिल ज्ञानदेव पाटील वय-50वर्षे रा. रुक्मिनीनगर ,कराड 
10. राजेंद्र रामदास सपकाळ वय-48वर्षे रा. रुक्मिनीनगर कराड 
11.  शांतीलाल बाबूलाल ओसवाल वय-69वर्षे रा.शनिवार पेठ,कराड 
12. दयालाल बहुतमल भंडारी वय-56वर्षे रा. बुधवार पेठ,कराड 
13.  हारुण जाफर मुल्ला वय-65वर्षे रा.शनिवार पेठ,कराड 
14. आक्रम हुमायन तांबोळी वय-36वर्षे रा.मंगळवार पेठ,कराड 
15. अमन असिफ बागवान वय-19वर्षे रा.मंगळवारपेठ,कराड 
16. संतोष लक्ष्मण यादव वय-47वर्षे रा.रुक्मिनीनगर,कराड 
17. मंथन संतोष यादव वय-22वर्षे रा. रुक्मिनीनगर,कराड
18. साहेबलाल अल्लीशेख वय-60वर्षे रा.शनिवार पेठ,कराड 
19. बापू जयपाल चांदणे वय-44वर्षे रा.बुधवार पेठ,कराड 
20. किर्तीकुमार रमणिकलाल सोनी वय-50 वर्षे रा.शनिवार पेठ,कराड 
21. प्रभुदास प्रेमजी पटेल वय-54वर्षे रा.शनिवार पेठ,कराड 
22. स्वप्निल शांताराम चव्हाण वय-37वर्षे रा. बुधवार पेठ,कराड 
23. कृष्णा रघुनाथ रासमकर वय-62वर्षे रा.विद्यानगर,कराड
24. तुकाराम शंकर कदम वय-65वर्षे रा. विद्यानगर कराड, 
25. विवेक विठ्ठल खांडके वय-31वर्षे रा.गजानान हौसी.सोसा.सैदापूर ,कराड 
26. चंद्रकांत धनसिंग चव्हाण वय-45वर्षे रा.गजानन हौसि.सोसा.कराड
27. सागर सोपान अवधूत वय-39वर्षे रा.सैदापूर ता.कराड 
28. प्रभाकर विष्णूपंत राव वय-65वर्षे रा.गजानन हौसिंग सोसा.कराड 
29. विपूल पांडूरंग पाटील वय-24वर्षे रा.गजानन हौसिंग सोसायटी,सैदापूर कराड 
30. तेजस काशिनाथ राठोड वय-44वर्षे रा.विद्यानगर,कराड 
31. प्रदिप शंकरराव पाटील वय-52वर्षे रा.विद्यानगर ,कराड 
32. शामराव गणपती कांबळे वय-58वर्षे रा.विद्यानगर,कराड 
33. संजय जगन्नाथ साठे वय-54वर्षे रा.विद्यानगर कराड , 
34. गणेश विठ्ठल खांडके वय-32वर्षे रा.सदाशिव कॉलनी ओगलेवाडी 
35. अमृत दत्तात्रय पाटील वय-56वर्षे रा.मंळवार पेठ,कराड 
36. रागेश आण्णा पवार वय-54वर्षे रा.ओगलेवाडी ता.कराड
37. गणेश दिनकर बामणे वय-45वर्षे रा.गुरुवार पेठ,कराड 
38. बिरु लालासो कोळी वय-22वर्षे रा.ओगलेवाडी ता.कराड
39. अवधूत आनंदा शिवणीकर वय-19वर्षे रा.ओगलेवाडी
40. शौकत दादासो सुतार वय-37वर्षे रा.बनवडी कॉलनी,कराड 
41. जयसिंग पांडूरंग एटम वय-45वर्षे रा.बनवडी कॉलनी,बनवडी ता.कराड
42. विठ्ठल प्रभू चंदनशिवे वय-40वर्षे रा.पार्ले ता.कराड 
43. दिग्विजय बाळासो सुतार वय-30वर्षे रा.बनवडी कॉलनी,कराड 
44. लक्ष्मण धोंडीराम देशमुख वय-38वर्षे रा.मुखबधीर शाळेजवळ गजानन हौसिंग सोसायटी कराड , 
45. राकेश लालचंद शहा वय-40वर्षे रा.सह्याद्री हौसि.सोसायटी कराड 
46. सुभाष धोंडीराम पालसांडे वय-61वर्षे रा.ओगलेवाडी ता.कराड 
47. विजय कुमार विश्वनाथ शेवडे वय-59वर्षे रा.एस.जी.एम.कॉलेज समोर विद्यानगर,
48.  विवेक जगन्नाथ कुंभार वय-50वर्षे रा.गजानन हौसिं.सोसा.कराड 
49. सुभाष बाजीराव पवार वय-55वर्षे रा.बनवडी कॉलनी ,कराड
50. निवृत्ती गणपती कुंभार वय-53वर्षे रा.चैतन्य कॉलनी बनवडी 
51. संजय संपत थोरात वय-50वर्षे रा. राजसारथी कॉलनी बनवडी 
52. तेजपाल कांतिलाला भंडारी वय-48वर्षे रा.वाखान रोड कराड 
53. रामदास आनंदा गायकवाड वय-32वर्षे रा. बाराडबरी कराड 
54. जयवंत जालिंदर पवार वय-37वर्षे रा.गजानन हौसिंग सासायटी कराड 
55. अक्षयकुमार राजाराम माळी वय-25वर्षे रा. बनवडी ता.कराड
56. महिबुब इसाक शेख वय-54वर्षे रा. रुक्मिनीपार्क कराड
57. हुसेन इरशाद बागवान वय-21वर्षे रा.शनिवार पेठ,कराड 
58. अल्तमश आक्रम बागवान वय-25वर्षे रा.गुरुवार पेठ,कराड 
59. राकेश जगन्नाथ आडके वय-35वर्षे रा. शिवाजी स्टेडीयमजवळ कराड ,
60.  आनंद मनोहर काळे वय-58वर्षे रा.विद्यानगर ,कराड 
61. प्रकाश बाळकृष्ण बोध वय-60वर्षे रा.गजानन हौसींग सोसायटी कराड 
62. रफीक बद्दीनवाज शेख वय-20वर्षे रा. बाराडबरी कराड 
63. भिमराव सदाशिव घाडगे वय-54वर्षे रा. पाटील कॉलनी कराड 
64. जहिर आब्बास शब्बीर वय-38वर्षे रा. विद्यानगर कराड 
65. मयुर दायालाला गांधी वय-30वर्षे रा.मंगळवार पेठ,कराड 
66. महेंद्र हिमक्षमल पोरवाल वय-44वर्षे रा. मलकापूर ता.कराड 
67. राकेश किशोर भंडारी वय-30वर्षे रा.रविवार पेठ,कराड 
68. दिग्विजय बाळासाहेब मोहीते वय-30वर्षे रा. शिवाजी हौ.सोसा.कराड 
69. अश्पाक हारुण मुल्ला वय-35वर्षे रा.शनिवार पेठ,कराड 
70. अलाबक्ष ताहीर सुतार रा.मंगळवार पेठ,कराड 
71. अब्दुल ताहीर सुतार वय-61वर्षे रा.मंगळवार पेठ,कराड
72.  संतोष सिताराम पोळ वय-43वर्षे रा. गजानन हौसि.सोसा.कराड
73. संजय शिवाजी कदम वय-37 वर्षे रा.गजानन होसिंग सोसा.कराड 
74. सागर नारायण मुळे वय-41वर्षे रा.प्लॉट नं.28पी.डी.पाटीलनगर गजाननहौसिंग सोसायटी ताकराड 
75. दत्तात्रेय भिमराव करडे वय-63वर्षे रा.सदाशिव कॉलनी ,कराड 
76. रविंद्र नारायण येलगट्टे वय-39वर्षे रा.कराड 


पोलीसांचेकडून आवाहण 


सध्या जगभर व भारतभर कोरोणा विषाणू संसर्गाने थैमाण घातलेले आहे. सदरचे संक्रमण तोडण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालण करावे. घरात रहावे सुरक्षीत रहावे. कोणीही यात्रा, प्रार्थना व नमाजपठण याकरीता एकत्र जमू नये. तसेच सकाळी व सायंकाळी वॉकींग करता अथवा फेरफटका मारण्याकरीता रस्त्यावर फिरू नये. कराड शहरामध्ये पेालीस ठाणे हे 24 x 07 असे सतर्क पेट्रालिंग करत आहेत तसेच गोपनीय यंत्रणा कार्यरत असून असे नियमाचे उल्लंघण करणाऱ्या व्यक्तीवर आमचे विशेष लक्ष आहे. 


सदरची कामगिरी मा.उपविभागीय पेालीस अधिकारी श्री. सुरज गुरव साहेब व मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विजय गोडसे, राहूल वरोटे, अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक शिवराम खाडे,सहा.फौजदार राजेंद्र पुजारी, प्रदीप कदम, दीपक साळुंखे, पोलीस हवालदार खलील इनामदार, आप्पा आंेबासे, मारुती लाटणे, प्रफुल्ल गाडे अशा पथकाने कर्तव्य बजावलेले आहे.


 


 



उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद


मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पुण्याच्या 'हॉटेल वैशाली'तर्फे 1 कोटींची मदत


 पुणे, दि. 6: 'कोविड-19' च्या संकटाचा सामना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  'मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19' ला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत असून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. येथील प्रसिद्ध 'हॉटेल वैशाली'चे मालक जगन्नाथ शेट्टी यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला एक कोटी रुपयांची मदत केली आहे. शेट्टी यांच्या जगन्नाथ शेट्टी फौंडेशनच्या वतीने ही मदत करण्यात आली.


          याबाबत माहिती देताना, 'जगन्नाथ शेट्टी फौंडेशन'चे विश्वजित जाधव यांनी सांगितले,"जगन्नाथ शेट्टी फौंडेशन'च्या माध्यमातून आम्ही  समाजातील विविध उपक्रमांना मदत करत असतो. श्री. शेट्टी यांनी अतिशय सामान्य परिस्थितीतून वाटचाल केली आहे. त्यांना समाजातील गरीब आणि दुःखी लोकांच्याबद्दल  कळवळा वाटतो. ते समाजातील अडचणीच्या प्रसंगाला नेहमीच धावून जातात. आजवर त्यांनी अनेक उपक्रमांना मदत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ आणि प्रशासन महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी ज्यांना जे शक्य आहे ती मदत करण्याचे आवाहन केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांनी याबाबतचा सातत्याने पाठपुरावा केला."


             'हॉटेल वैशाली'चे मालक जगन्नाथ शेट्टी यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला एक कोटी रुपयांची मदत दिली आहे. शेट्टी यांच्या जगन्नाथ शेट्टी फौंडेशनच्या वतीने ही मदत करण्यात आली. प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन एक कोटीचा मदतीचा धनादेश स्वीकारला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सोशल डीस्टन्स ठेवून मदत स्वीकारन्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रांताधिकारी देशमुख यांनी धनादेश स्वीकारतानाही सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळला.


           पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले,"जगन्नाथ शेट्टी फौंडेशनने केलेली मदत प्रशासनाचे मनोबल वाढविणारी आहे. समाजातून मदतीचा ओघ वाढला तर आमचे बळ वाढेल. पुणे जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे. कोरोनाच्या सरकारच्या लढाईला बळ द्यावे."