महात्मा फुले यांचे काम दीपस्तंभासारखे : खासदार श्रीनिवास पाटील


महात्मा फुले यांचे काम दीपस्तंभासारखे : खासदार श्रीनिवास पाटील


कराड - महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळीमुळे आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी झाली. क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या त्याग अवस्मरणीय असून, त्यांच्या समर्पणामुळेच बहुजन समाजाला शिक्षणाची दरवाजे खुले झाली.महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव आजही मोठ्या अभिमानाने केला जातो.या दाम्पत्याने केलेले कार्य अनेक पिढ्यांना विसरता येणार नाही समाजासाठी दीपस्तंभासारखे काम यांनी उभा केले आहे अशी प्रतिक्रिया खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.


सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांना १९३ व्या जयंती निमित्त यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.