राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्यासाठी पुढे यावे : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील


राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्यासाठी पुढे यावे : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील


कराड :  राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या आपत्तीचे संकट दूर करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे येऊन जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देवून सहकार्य करावे, असे आवाहन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.


कराड येथील शासकीय विश्रामग्रहामध्ये पत्रकारांशी बोलताना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली.  राज्यातकोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम म्हणून  जगाची अर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. देशातही सर्वत्र उत्पादकता थांबली आहे, उद्योग बंद आहेत, लहान व्यवसायांवर गंडांतर आले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध सहकारी संस्था, स्वयंसेवकांनी तसेच दानशूर व्यक्तींनी  मोठ्या प्रमाणात मदत केली आहे हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे.


 पतसंस्था, बँका, सहकारी साखर कारखाने, सूतगिरणी, दूध संघ, ऑईल मिल यांच्या माध्यमांतून महाराष्ट्रात सहकाराच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात अर्थिक परिवर्तन घडले आहे.    राज्यात 475 नागरी बँका, 13 हजार 559 नागरी पतसंस्था, सात हजार 253 कर्मचारी पतसंस्था, 21 हजार 425 विकास सोसायटी, 95 हजार 468 सहकारी गृहनिर्माण संस्था, 215 साखर कारखाने, 67 सहकारी दूध संघ आहेत. इतक्या संस्थांद्वारे सहकाराचे जाळे राज्यभर पसरले आहे. सहकार कायद्यातही संस्थेच्या नफ्याच्या किती टक्के रक्कम मदत करावी, याची तरतूद आहे.  तरी राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मोठ्या प्रमाणत मदत करुन शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image