श्री गजानन सेवा ट्रस्ट यांचेकडून मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी रुपये २५ हजार रुपयांचा धनादेश


श्री गजानन सेवा ट्रस्ट यांचेकडून मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी रुपये २५ हजार रुपयांचा धनादेश 

 

कराड - कोरोना सारख्या भयंकर आजारामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे अनेक उद्योग,  व्यवसाय ठप्प आहेत त्यामुळे राज्याची आर्थिक घडी कोलमडली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक संस्थांमार्फत  तसेच वैयक्तीक पातळीवर मुख्यमंत्री सहयत्ता निधी म्हणून मदत केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गजानन हौसिंग सोसायटी कराड येथील श्री गजानन सेवा ट्रस्ट यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी रुपये २५ हजार रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आज सुपूर्द केला.

 

कोरोनाचे संकट काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करीत आहेत. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

 

कोरोना (कोविड १९)विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून  सरकारने लॉकडाउन वाढवला असून सरकारच्या उत्पन्नच्या स्रोतावर मर्यादा आल्या आहेत. शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक संस्थांमार्फत व वैयक्तिक पातळीवर मदत केली जात आहे. त्याचप्रमाणे  गजानन हौसिंग सोसायटी कराड येथील श्री गजानन सेवा ट्रस्ट यांचेकडून सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी रुपये २५ हजार रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. याप्रसंगी  शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व गजानन हौसिंग सोसायटीचे चेअरमन जयंत पाटील (काका), राजेंद्र वास्के, संतोष पाटील, राजू मेहता उपस्थित होते.

Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image