राजस्थानमध्ये अडकलेल्या २५०० विध्यार्थ्यांना तातडीने महाराष्ट्रात आणा....आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी 

 


राजस्थानमध्ये अडकलेल्या २५०० विध्यार्थ्यांना तातडीने महाराष्ट्रात आणा....आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी 


सातारा-  संपूर्ण जगात कोरोना साथीने थैमान घातले असून आपल्या देशात लॉक डाऊन सुरु आहे. दरम्यान, राजस्थान येथील कोटा जिल्ह्यात आयआयटी कोचिंग क्लासेससाठी गेलेले तब्बल २५०० विध्यार्थी व काही पालक त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ३५ जण असून काळाची गरज ओळखून महाराष्ट्र सरकारने राजस्थान येथील कोटा येथे अडकून पडलेल्या २५०० विध्यार्थी व पालकांना तातडीने महाराष्ट्रात आणावे, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 


सुमारे दोन वर्षांपूर्वी आयआयटीच्या शिक्षणासाठी महाराष्ट्रातून २५०० विध्यार्थी आणि काही पालक राजस्थान येथील कोटा जिल्ह्यात गेले आहेत. काही दिवसापासून कोरोना या साथीच्या आजाराने संपूर्ण जगाला विळखा घातला असून आपल्या देशातही या महामारीने हाहाकार उडालेला आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी आणि देशातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉक डाऊन लागू केला आहे. त्यामुळे जिल्हा व राज्याच्या सीमा बंद आहेत. दरम्यान, आयआयटी शिक्षणानिमित्त देशभरातील विविध राज्यातून गेलेले विध्यार्थी राजस्थान येथील कोटा येथे अडकून पडलेले आहेत. यामध्ये  महाराष्ट्रातून गेलेले २५०० विध्यार्थी आणि काही पालक यांचाही समावेश आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ३५ जण सुद्धा कोटा येथे अडकलेले आहेत. कोरोनामुळे देशभरातील जनजीवन विस्कळीत झाले असून कोटा येथे अडकलेल्या विध्यार्थी आणि पालकांचे अतोनात हाल होत आहेत. अनेकांवर उपासमारीचीही वेळ आली आहे. 


कोटा येथील जिल्हाधिकारी यांनी अडकून पडलेल्या विध्यार्थी आणि पालकांना त्यांच्या राज्यात परतण्याची परवानगी दिलेली असून त्यानुसार उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा या राज्यांच्या सरकारने त्यांच्या राज्यातील विध्यार्थी परत आणण्याची परवानगी देऊन त्यांना आपापल्या राज्यात नेले आहे. दरम्यान, आपल्या महाराष्ट्रातील विध्यार्थी कोटा येथून महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आपल्या राज्य सरकारने राजस्थान सरकारला परवानगी असल्याचे कळवणे आवश्यक आहे. कोटा जिल्हाधिकाऱ्यांकडून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची यादी महाराष्ट्र सरकारला प्राप्त होईल. त्यामुळे तातडीने महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन कोटा येथे अडकून पडलेल्या २५०० विध्यार्थी व पालकांना त्वरित महाराष्ट्रात आणण्यासाठी आपण तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री ना. ठाकरे व उपमुख्यमंत्री ना. पवार यांच्याकडे केली आहे.