वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांचे वार्तांकन जिल्हा व प्रशासनासाठी कौतुकास्पद - जिल्हाधिकारी शेखर सिंह


वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांचे वार्तांकन जिल्हा व प्रशासनासाठी कौतुकास्पद - जिल्हाधिकारी शेखर सिंह


सातारा : वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्या जिवाची परवा न करता सर्व पत्रकार मित्र सर्व सामान्य माणसांपर्यंत कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना जिल्हास्तरावर केल्या जात आहेत  त्याचं वार्तांकन करत आहेत हे कौतुकास्पद असून आत्तापर्यंत जे जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले, यापुढेही असे सहकार्य करावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली.


वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेऊन गेले 40 ते 50 दिवस कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या उपायोजनांची तसचे कोरोना संसर्गाबाबत चांगल्या पद्धतीने जनजागृती केली आहे. पत्रकारांनी वार्तांकन करताना मास्क घालून बाहेर पडावे तसेच सुरक्षित अंतर ठेवून वार्तांकन करावे. कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करु नये व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.